Kantara Chapter 1 Day 1 Box Office Collection : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. कांताराने रजनीकांत यांचा कुली आणि ब्लॉकबस्टर छाया या चित्रपटांना मागे टाकले आहे.
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची पहिल्या दिवसाची कमाई
ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइट sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ने जवळपास 60 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमधून झाली आहे. तर ACNILC च्या अहवालानुसार, 'कांतारा: चॅप्टर 1' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 65.3 कोटींची कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या कुलीने पहिल्या दिवशी 65 कोटींची कमाई केली होती.
25
मोठ्या चित्रपटांना टाकले मागे
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ने पहिल्याच दिवशी 'कांतारा' या पहिल्या भागाच्या आठवड्याभराच्या कमाईला जवळपास दुप्पट फरकाने मागे टाकले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'ने पहिल्या दिवशी फक्त 1.95 कोटी रुपये कमावले होते, तर त्याच्या पहिल्या आठवड्याची कमाई 30.3 कोटी रुपये होती. या वर्षीचे ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैयारा' 22 कोटी, 'सिकंदर' 26 कोटी आणि 'छावा' 31 कोटीच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला 'कांतारा: चॅप्टर 1'ने मागे टाकलं आहे.
35
2025 चा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला 'कांतारा चॅप्टर 1'
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' हा 2025 मधील चौथा चित्रपट ठरला आहे, ज्याने पहिल्या दिवशी भारतात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधी 'दे कॉल हिम OG', 'वॉर 2' आणि 'गेम चेंजर' या तीनच चित्रपटांनी अशी कामगिरी केली होती. त्यांची पहिल्या दिवसाची कमाई अनुक्रमे 63.75 कोटी, 52 कोटी आणि 51 कोटी रुपये होती. हा 'दे कॉल हिम OG' नंतर या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची निर्मिती सुमारे 125 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. यानुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 50 टक्के बजेट वसूल केले आहे. 'पुष्पा' (फ्रँचायझी) आणि 'महावतार नरसिंह' सारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध 'होम्बळे फिल्म्स'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
55
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची स्टार कास्ट
ऋषभ शेट्टीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून तोच मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय रुक्मिणी वसंत, गुलशन देवय्या, जयराम, प्रमोद शेट्टी, प्रकाश थुमिनाद आणि दीपक राय पनाजे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.