Kingdom Box Office Collection Day 1 : विजय देवरकोंडाच्या किंगडम सिनेमाचा पहिल्याच दिवशी धमाका, जाणून घ्या कलेक्शनचे आकडे

Published : Aug 01, 2025, 08:51 AM IST
Kingdom Movie

सार

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा किंगडमने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सिनेमाची डबल डिजिटमध्ये कमाई झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘किंगडम’ सिनेमा (Kingdom) गुरुवारी (31 जुलै) रिलीज झाला. या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पहिल्याच दिवशी मिळाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय चाहत्यांना विजयचा सिनेमा फार पसंतीस पडला आहे. अशातच किंगडम सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई किती झाली याची माहिती समोर आली आहे. सिनेमाने तमिळ ते हिंदी भाषेत रिलीज झाल्यानंतर उत्तम कमाई केली आहे.

ताज्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये एकूण 15.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅन्क्लिकच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत सिनेमाने 15 कोटी रुपयांची कमाई केली असून ही सर्व भाषांमध्ये रिलीज झालेल्याची आकडेवारी आहे. विजयच्या करियरमधील हा बेस्ट सिनेमांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सिनेमाच्या कमाईला विजयचा ‘लाइगर’ (Liger) सिनेमाला मागे टाकता आले नाही. ‘लाइगर’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 15.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, किंगडम सिनेमाने धनुषच्या ‘कुबेरा’ सिनेमाला मात्र मागे टाकले आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 13 कोटींची कमाई केली होती.

 

 

तमिळ भाषेत रिलीज झालेल्या किंगडम सिनेमासाठी गुरुवारी एकूण 56.73 टक्के उपस्थिती दिसली. सकाळच्या शो साठी 63.54 टक्के, दुपारच्या शो साठी 56.52 टक्के आणि रात्रीच्या शो साठी हीच टक्केवारी कमी होत 50.12 टक्क्यांवर आली. पण विकेंडला प्रेक्षकांची सिनेमासाठी गर्दी वाढण्याचा अंदाज आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, शनिवार-रविवारी प्रेक्षक सिनेमासाठी किती प्रमाणात गर्दी करतात. एकूणच सिनेमाच्या रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाल्यास, सिनेमात विजयने दमदार अभिनय केला आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे त्यावर टीकाही केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!