
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर हिने नवरा संजय कपूरकडून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. यावर्षी १२ जून रोजी संजय यांच्या घशात माशी गेली आणि त्यातच मृत्यू झाला. संजय यांच्या संपत्तीत त्यांची एक्स पत्नी करिष्मा कपूर हिने हिस्सा मागितला असल्याची चर्चा सुरु आहे. संजय यांची आई राणी कपूर यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली होती.
अभिनेत्री करिष्मा कपूरचा तिचा पती संजय कपूरच्या संपत्तीशी संदर्भात असणाऱ्या गोष्टींमध्ये संबंध नाही अशी कबुली जवळच्या व्यक्तींनी दिली. या केवळ अफवा असल्याचं सांगण्यात आलं. करिश्माचा संबंध नसल्यामुळं तिचा संपत्तीशी संदर्भात असणाऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये संबंध राहणार नाही. करिष्माच्या मुलांना मात्र या संपत्तीत अधिकार मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, मुलाच्या शोकसभेच्या वेळेला त्यांच्यावर कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र हा दबाव कोणाकडून आणला जात होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
२००३ मध्ये लग्न केल्यानंतर २०१६ मध्ये घेतला घटस्फोट अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये अभिषेक बच्चनसोबतचा साखरपुडा मोडून दिल्ली स्थित बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले. त्यांना कियान आणि समायरा ही दोन मुले आहेत. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
संजय कपूर एक उद्योजक होता. ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचा तो अध्यक्ष होता. या कंपनीचे जगभरात ९ कारखाने आहेत. फोर्ब्सच्या मते, संजय कपूर यांची एकूण संपत्ती 1.2 अब्ज म्हणजेच १०३,१४२,७९९,६०० रुपये आहे. फोर्ब्स आणि रिअल-टाइम मिलिनियर्सने त्याला अब्जाधीश घोषित केले होते. संजयच्या मागे अनेक लक्झरी कार आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत.