हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला 'Fighter' सिनेमातील या Scene वरुन धाडलीय कायदेशीर नोटीस

Published : Feb 06, 2024, 01:03 PM ISTUpdated : Feb 06, 2024, 01:06 PM IST
Fighter Movie

सार

अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर सिनेमा गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पण आता 'फायटर' सिनेमाच्या अडचणीत वाढ झाली असून निर्मात्यांना कायदेशीर नोटीस धाडण्यास आली आहे.

Fighter Movie : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टार 'फायटर' सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षकांची फार गर्दी होत आहे. या सिनेमात दीपिका आणि हृतिक हवाई दलाच्या (Air Force) युनिफॉर्ममध्ये झळकले आहेत. पण आता सिनेमाच्या अडचणी वाढल्या आहेत.

'फायटर' सिनेमाच्या दिग्दर्शकांसह हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांना कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. खरंतर, नोटीस सिनेमातील एका सीन संदर्भातील असून त्यामध्ये हृतिक आणि दीपिका एकमेकांशी जवळीकता साधताना दिसून येत आहेत. याच सीनवरुन एक हवाई दलाचे अधिकारी संतप्त झाले आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमातील सीनवरुन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी फायटरचे दिग्दर्शक, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला कायदेशीर नोटीस धाडली आहे. सिनेमातील कथित किसिंग सीनवरुन ही नोटीस धाडल्याचे सांगितले जात आहे.

हवाई दलातील अधिकाऱ्यांनी म्हटले की, सिनेमातील किसिंग सीन हवाई दलाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवत आहे. खरंतर हा सीन हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये शूट करण्यात आला आहे. यामुळेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी कथित किसिंग सीनचा मुद्दा उचलून धरला आहे.

'फायटर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम
'फायटर' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. सिनेमातील अ‍ॅक्शन सीन, फाइट सीन आणि व्हीएफएक्स देखील शानदार असून प्रेक्षकांना ते फार आवडत आहे. 'फायटर' सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिलाच ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.

आणखी वाचा : 

इरफान पठाणने ॲनिव्हर्सरीनिमित्त आठ वर्षांत प्रथमच जगाला दाखवला पत्नीचा चेहरा

सोनम कपूरच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?

रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा होणार प्रसारीत

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!