ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर, दोन वर्षांपूर्वीची त्यांची एक मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे, ज्यात त्यांनी 'मला मरणाची घाई नाही' असे म्हटले होते.
मला मरणाची घाई नाही, सतीश शाह यांना मृत्यूबद्दल आधीच कसं समजलं होतं?
जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या मृत्यूमुळे बॉलिवूड चाहत्यांसोबत सामान्य नागरिकांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेली मुलाखत परत एकदा चर्चेत आली आहे.
25
सतीश शाह काय म्हणाले होते?
सतीश शाह यावेळी बोलताना म्हणाले होते की, 'मी आता सार्वजनिक ठिकाणी काम करणे थांबवले आहे, जसे की, चित्रपटांमध्ये आणि इतरत्र. मी एक सुट्टी घेतली आहे, असं तुम्ही म्हणू शकता, आणि ती एक मोठी सुट्टी आहे.
35
एखाद्या गोष्टीचा मी आनंद घेत असेल तरच मी करतो
ही गोष्ट पूर्वीपासूनच माझ्या स्वभावात आहे की, एखाद्या गोष्टीचा मी आनंद घेत असेन, तरच मी ती करतो. मी गेल्या काही काळापासून काम एन्जॉय करू शकत नव्हतो, म्हणून मी विचार केला की कदाचित मी जोमाने परतण्यासाठी स्वत:वर काम करेन आणि नंतर पुन्हा सुरुवात करेन.
मला मरणाची घाई नाही असं त्यांनी त्यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. यावेळी त्यांना त्यांचे जुन्या काळातील मित्र फारुख शेख यांची आठवण आली होती. यावेळी त्यांना त्यांचे अश्रू लपवता आले नाही.
55
मनोरंजन क्षेत्रात केलं दीर्घकाळ काम
मनोरंजन क्षेत्रात सतीश यांनी बऱ्याच वर्षांपासून काम केलं. आजही ते भारतातील सर्वात आवडत्या कॉमिक अभिनेत्यांपैकी एक आहेत. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीधर आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे माजी विद्यार्थी असलेल्या या अभिनेत्याने 1978 मध्ये 'अरविंद देसाई की अजीब दास्तान' या चित्रपटातून पदार्पण केले.