सलमान खानसोबत काम करताना 'या' मराठी अभिनेत्रीला कसा अनुभव आला? ऐकून तुमच्या कानाचे पडदे जातील फाटून

Published : Oct 29, 2025, 09:37 AM IST

मराठी अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी सलमान खानसोबत 'तेरे नाम' चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, सलमान खान सेटवर सर्वांशी मिळून मिसळून वागायचा आणि त्याच्यामुळे स्टारडम जवळून अनुभवता आले. 

PREV
16
सलमान खानसोबत काम करताना 'या' मराठी अभिनेत्रीला कसा अनुभव आला? ऐकून तुमच्या कानाचे पडदे जातील फाटून

सलमान खानसोबत हिंदीसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी काम केली. त्याच्यासोबत काम केल्यानंतर अनेकांनी कामाचा अनुभव कसा असतो हे शेअर केलं. आता एका मराठी अभिनेत्रीनं आपला अनुभव सांगितला आहे.

26
सविता प्रभुणे यांना कसा आला अनुभव

सविता प्रभुणे यांनी सलमान खानसोबत काम केलं असून आपला अनुभव शेअर केला. त्यांनी सलमानसोबत तेरे नाम चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी प्रमुख भूमिका केली होती.

36
तेरे नाम चित्रपटात कसं मिळालं काम?

तेरे नाम या चित्रपटात काम कस मिळालं याचा अनुभव सविता प्रभुणे यांनी सांगितलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, सतीश कौशिक यांनी मला डेली सोपचे काम बाजूला ठेवून माझ्यासोबत चित्रपटात काम कर असं म्हटलं.

46
कुसुम मालिकेत करत होते काम

सविता या सकाळी कुसुम मालिकेचे शूटिंग पूर्ण करायच्या आणि संध्याकाळी चित्रपटाच्या सेटवर जाऊन पोहचायच्या. यावेळी त्यांना बालाजी टेलिफिल्म्सने खूप सांभाळून घेतल्याचा अनुभव शेअर केला.

56
सलमान खानबद्दल कोणते आले अनुभव?

सलमान खान याच्यासोबत काम करताना खूप चांगले अनुभव आल्याचं सविता यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी म्हटलं आहे की, स्टारडम फार जवळून अनुभवता आले. ते सगळ्यांसोबत मिळून मिसळवून वागायचे.

66
मराठी चित्रपटांबद्दल काय म्हणाल्या?

मराठी चित्रपटांबद्दल बोलताना सविता यांनी सांगितलं की, सध्या मराठीमध्ये खूप चांगले चित्रपट येत आहेत. मी टीव्हीवरील मालिकेत काम करते. हे प्रोजेक्ट खूप मोठे असतात. सध्या मोकळा वेळ मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories