गौतमी पाटील: गौतमी पाटीलचे 'दिसला गं बाई दिसला' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात गौतमीच्या एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या साथीने जुन्या गाण्याला नवा बाज दिला आहे.
गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यानं वाढवला हॉटनेस, गाणे पाहून होतील गुदगुल्या
गाण्याच्या तालावर ठेका धरून संपूर्ण महाराष्ट्राला गौतमी पाटीलने नाचायला लावलं. पुणे अपघात प्रकरणापासून परत एकदा ती चर्चेत आलेली दिसून आली. तिचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यामुळं सगळीकडच्या प्रेक्षकांना वेड लागलं आहे.
26
दिसला गं बाई दिसला गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
दिसला गं बाई दिसला हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात गौतमी पाटीलने ठुमके लावले असून तीचे गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेलं दिसून आलं आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये एक नंबरला पोहचले आहे.
36
गौतमी पाटीलच्या एनर्जीने गाण्यात आली मजा
गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे या गाण्यामध्ये एनर्जी आल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये तिला मराठी अभिनेता ललित प्रभाकर याची साथ लाभली आहे. राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल लाभलेलं हे गाणं अधिकच श्रवणीय बनलं आहे.
या जुन्या गाण्याला नवीन बाज देण्यात आला असून त्यामुळं हे गाणे जास्तच मनोरंजक वाटत आहे. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन फेव्हरेट ठरतंय.
56
दिग्दर्शक सतीश राजवाडे काय म्हणाले?
सतीश राजवाडे यांनी म्हटलं आहे की, "हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं."
66
गाण्याने प्रेक्षकांचा वाढवला उत्साह
या गाण्याने प्रेक्षकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास’ २१ ऑक्टोबरला चित्रपटगृहात उलगडणार आहे. या चित्रपटामधील हे आयटम सॉंग आहे.