इस्माईल दरबार: प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सलमानला ऐश्वर्याचा भूतकाळ म्हटले आहे.
मला १०० कोटी दिले तरी मी काम करणार नाही, इंडस्ट्रीतील 'या' व्यक्तीनं सलमान खानबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य
बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी कायमच चर्चेत राहत असते. या दोघांबाबत कायम अफवा उठत असतात. आता या दोघांबाबत एक मोठा खुलासा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांनी केला आहे.
26
ऐश्वर्या रायचा भूतकाळ सलमान खान होता
ऐश्वर्या रायचा भूतकाळ सलमान खान होता असं इस्माईल दरबार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याविरुद्ध शाहरुख खानला कास्ट केलं असं इस्माईल यांनी सांगितलं आहे.
36
शंभर कोटी रुपये दिले तरी जाणार नाही
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय भन्साळी यांना गर्विष्ठ म्हटलं आहे. खरंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक आणि म्युझिक डिरेक्टर अशी जोडी विचारली तर त्यात संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार या जोडीचं नाव येतंच.
इस्माइल दरबार आणि संजय लीला भन्साळी या दोघांमध्ये कटुता का आली?
इस्माइल दरबार आणि संजय लीला भन्साळी या दोघांमध्ये सध्या कटुता आली आहे. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळी यांना गर्विष्ठ म्हणून हिणवलं आहे.
56
ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्यावर काय फरक झाला?
"हम दिल दे चुके सनम" आणि "देवदास" च्या कास्टिंगवरून खूप वाद झाला होता, परंतु दोन्ही चित्रपट हिट ठरले आहेत. इस्माइलने स्पष्ट केले की संजय लीला भन्साळींनी देवदासमध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले.
66
सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध का बिघडले?
इस्माइल दरबार म्हणाले की, जेव्हा मला कामाची गरज होती त्यावेळी त्यांनी मला हम दिल दे चुके सनममध्ये संधी दिली. इस्माइल म्हणाले, "मला वाटते की सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडले कारण त्याने सलमानऐवजी देवदास चित्रपटात शाहरुख खानला कास्ट केले. खामोशी फ्लॉप झाला तेव्हाही सलमानने त्याला पाठिंबा दिला.