खळबळ जनक! सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर; सलमानच्या सुरक्षेत वाढ

Published : Apr 14, 2024, 09:22 AM ISTUpdated : Apr 14, 2024, 12:27 PM IST
Salman Khan

सार

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Salman Khan : मुंबईतून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. अभिनेता सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटे ४.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून हल्लेखोरांचा पोलिस तपास घेत आहे. 

सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञातांनी चार फायर राऊंड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. याशिवाय पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत.

यापूर्वीही धमकी देण्याच्या घटना :

यापूर्वी २०२२ मध्ये सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला धमकीचा ईमेल आला होता.अशातच पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एकच खळबळ उडाली आहे.

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अनेकदा दिल्या आहेत धमक्या :

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका टेलिव्हिजन मुलाखतीत त्याने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही त्याने हल्ला केला होता आणि सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.

आणखी वाचा :

मुंबईत पूजा हेगडेने घेतला बॉलिवूडमधील सर्वात महागडा फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क

वडिलांनी दारूच्या नशेत केलेल्या या कृत्यामुळे गमवावे लागले संपूर्ण कुटुंब, अभिनेत्याने अनेक वर्षांनी सांगितले मनातील दु:ख

TMKOC मधील अभिनेत्री जेनिफर मिस्रीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!