हृतिक रोशनच्या Fighter सिनेमावर आखाती देशात बंदी, फक्त UAE मध्ये होणार प्रदर्शित

Published : Jan 24, 2024, 02:31 PM ISTUpdated : Jan 24, 2024, 02:33 PM IST
Fighter Movie

सार

बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'फायटर'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल जोरदार चर्चा केली जात आहे. सिनेमाच्या रिलिजची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच आखाती देशांनी ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे.

Fighter Movie Banned in Gulf Countries : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर सिनेमा 'फायटर' (Fighter) 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच सिनेमासंदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘फायटर’ सिनेमावर आखाती देशांनी (Gulf Countries) बंदी घातली आहे. यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. 

आखाती देशांमध्ये फायटर सिनेमावर बंदी
चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माते गिरीश जोहर (Girish Johar) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती देत म्हटले की, पाच आखाती देशांनी हृतिक रोशनच्या ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातली आहे. सिनेमा फक्त संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला युएईमधील सेंसर बोर्डाने PG15 रेटिंग दिली आहे. ‘फायटर’ सिनेमावर आखाती देशांनी बंदी का घातलीय याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

‘फायटर’ सिनेमाची कथा
‘फायटर’ सिनेमाची कथा बालाकोट एअरस्ट्राइकवर (2019 Balakot Airstrike) आधारित आहे. या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोणसह अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय झळकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे बजेट 250 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : 

शोएब मलिकसाठी सानिया मिर्झाने SRKकडे मागितली होती ही मदत

अभिनेत्री सना जावेदच नव्हे या कलाकारांनीही क्रिकेटर्ससोबत केलयं लग्न

यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणार बॉलिवूडमधील हे Horror Movies

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज