Cinema News : ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. असाच एक सायको थ्रिलर चित्रपट सध्या ओटीटी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कोणता आहे हा चित्रपट? चला जाणून घेऊया त्याची कथा.
अलीकडेच थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या आणि अनपेक्षितरीत्या यश मिळवलेल्या 'कलामकावल' या सायको थ्रिलर चित्रपटाने आता ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. खूप कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. एकूण कलेक्शन 80 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याने निर्मात्यांना मोठा नफा झाला. थिएटरमधील प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आता डिजिटल प्रेक्षकांकडूनही मिळत आहे.
25
OTT वर हिट ठरलेला इंटेन्स क्राईम थ्रिलर
गेल्या आठवड्यात अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाले. तरीही, हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष आकर्षित करत आहे. सीरियल किलरच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा, पहिल्या सीनपासूनच तणाव वाढवणारी पटकथा आणि अनपेक्षित ट्विस्ट्स ही या चित्रपटाची प्रमुख ताकद आहे. म्हणूनच IMDb सारख्या प्लॅटफॉर्मवरही टॉप रेटिंग मिळवत हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
35
खऱ्या प्रकरणावर आधारित एक भयानक कथा
या चित्रपटाची कथा वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे. एकेकाळी तामिळनाडू आणि केरळ पोलिसांना हादरवून सोडणाऱ्या सायनाईड मोहन प्रकरणावरून प्रेरित होऊन ही कथा तयार करण्यात आली आहे. सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे कथेतील प्रत्येक दृश्य अधिक भीतीदायक वाटते. कथेचा वेग कुठेही कमी न होता शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवेल, अशा प्रकारे याची मांडणी केली आहे.
स्टॅन्ली दास (ममूटी) नावाचा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कुटुंबासोबत शांतपणे आयुष्य जगत असतो. बाहेरून त्याचे आयुष्य सामान्य दिसते. पण त्याच्या आत लपलेला दुसरा चेहरा अत्यंत विकृत आहे. तो एकट्या महिला, विधवा आणि घटस्फोटित महिलांना लक्ष्य करून त्यांचा विश्वास जिंकतो. नवीन आयुष्याचे आमिष दाखवून त्यांना हॉटेलच्या रूममध्ये नेतो, आधी त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो आणि नंतर सायनाईड वापरून त्यांना संपवतो. अशा प्रकारे त्याने वीसपेक्षा जास्त महिलांना जीवे मारले आहे.
55
स्टॅन्ली दासचं शेवटी काय झालं?
स्टॅन्ली दास असा सायको किलर का बनला? पोलिसांनी त्याचे धागेदोरे कसे शोधले? शेवटी तो पकडला गेला की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. या उत्कंठावर्धक कथेला मल्याळम सुपरस्टार ममूटी यांनी जिवंत केले आहे. त्यांच्या अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. हा मल्याळम चित्रपट सध्या Sony LIV वर उपलब्ध आहे. क्राईम थ्रिलर चित्रपट आवडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.