
Devra Review : दाक्षिणात्य सिनेमा ‘आरआरआर’ने (RRR) संपूर्ण जगभरात आपला डंका वाजवला होता. याच सिनेमातून ज्युनियर एनटीआरने (Junior NTR) इतिहास रचला होता. आता एनटीआरचा ‘देवरा’ सिनेमा रुपेरी पडद्यावर अखेर 27 सप्टेंबरला रिलीज झाला आहे. सिनेमाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 2 तास 57 मिनिट आणि 58 सेकंदाचा संपूर्ण सिनेमा आहे. देवरा सिनेमा पाहिल्यानंतर युजर्सकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
देवरा सिनेमा प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन करतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर युजर्सने रिव्हू देत म्हटले की, "आत्ताच देवरा सिनेमा पाहिला आणि मी दंग झालो. सिनेमातील सीन, दिग्दर्शन आणि अॅक्शन सर्वकाही उत्तम आहे. ज्युनियर एनटीआरने खरंच मस्त काम केले आहे. पुन्हा एकदा सिनेमा पाहण्याची वाट पाहत आहे." दुसऱ्याने म्हटले की, “देवरा धमाकेदार आणि शानदार सिनेमा आहे. डान्स आणि अॅक्शन सीनही पाहण्यासारखे आहेत. एन.टी. रामा राव ज्युनियर नेहमीच धमाका करतात.”
सैफ अली खानच्या भूमिकेबद्दल युजर्स म्हणतात…
ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर स्टारर देवरा सिनेमाबद्दल एका युजरने लिहिले की, सिनेमातील अॅक्शन सिक्वेंस, अभिनय आणि कथा शानदार आहे. सिनेमा पाहण्यास आवडणाऱ्या प्रत्येकाने देवरा पहावा. सिनेमात अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन उत्तम पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. सैफच्या भूमिकेबद्दल एकाने म्हटले की, तो विलेनच्या भूमिकेत दिसला आहे.
देवरा सिनेमाचे बजेट
देवरा सिनेमात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान,प्रकाश राज, श्रुती मराठे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सिनेमाच्या बजेटबद्दल बोलायचे झाल्यास 300 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जातेय. सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्याआधी देवराने प्री-सेल्स आणि अॅडव्हान्स तिकीट बुकिंगच्या माध्यमातून 180 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देवरा सिनेमा पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा :
IMDB वरील सर्वाधिक रेटिंग्स मिळालेले सिनेमे, या कलाकाराचे तर 6 Movies
शाहरुख खान ते सुनील शेट्टी...B-Town सेलिब्रेंटींच्या घरांची अनोखी नावे