अशी दिसते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची लेक दुआ, पाहा 5 क्युट फोटो!

Published : Oct 22, 2025, 11:15 AM IST

Deepika Padukone Ranveer Singh daughter Dua : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अखेर त्यांची एक वर्षाची मुलगी दुआ पादुकोण सिंगचा चेहरा दाखवला आहे. दीपिका-रणवीर दोघांनीही आपापल्या इंस्टाग्रामवर दुआचे क्युट फोटो शेअर केले आहेत.  

PREV
15
रणवीर सिंग-दीपिका पादुकोणची मुलगी

रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ एक वर्षाची झाली आहे. तिचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी झाला. जन्मापासून त्यांनी तिचा चेहरा दाखवला नव्हता. पण दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी दुआचा चेहरा सर्वांना दाखवला.

25
रणवीर-दीपिकाची खट्याळ मुलगी

दीपिका आणि रणवीरची मुलगी दुआ खूपच खट्याळ आहे. फोटोंमध्ये ती कधी हसते, तर कधी तोंडात बोट घालताना दिसते.

35
लाल फ्रॉकमध्ये निरागस दिसली दुआ

समोर आलेल्या फोटोंमध्ये रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. तर, दीपिकानेही तिच्या मॅचिंग रंगाचा हेवी जरी वर्क असलेला सूट घातला आहे.

45
चाहते करत आहेत दुआवर प्रेमाचा वर्षाव

दीपिकाच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता दुआचा चेहरा समोर आल्यावर चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

55
दुआने आई दीपिका पादुकोणसोबत केली पूजा

या फोटोत दुआ आई दीपिकाच्या मांडीवर बसून हात जोडून पूजा करत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दुआला प्रेम पाठवले आहे.

Read more Photos on

Recommended Stories