अभिनेत्री आलिया भट तिची मुलगी राहासाठी रोज एक मेल लिहिते. हे सर्व मेल एकत्र करून ती राहासाठी एक पुस्तक तयार करणार आहे, जे ती तिला तिच्या १८व्या वाढदिवसाला भेट म्हणून देणार आहे. आलियाने एका टॉक शोमध्ये ही माहिती दिली.
आलीया राहाला १८ व्या वाढदिवशी देणार 'हे' खास गिफ्ट, जाणून तुम्हाला वाटेल आम्ही का नाही केलं
आलीया भट आणि रणबीर कपूर हे जोडपे कायमच चर्चेत राहत असते. त्या दोघांची मुलगी राहा हिला दोघांनी सोशल मीडियापासून दूर ठेवले. आता ते दोघे मात्र तिला घेऊन जात असतात.
26
राहाच्या सौंदर्याने जिंकलं मन
राहा १ वर्षांची असल्यापासून तिच्या निरागस सौंदर्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलं आहे. आता राहा कायमच प्रसिद्धी माध्यमांमध्ये दिसून येत असते. तिला एक प्रकारची लोकप्रियता या दोघांमुळे मिळाली आहे.
36
आलिया एक टॉक शोमध्ये झाली होती सहभागी
अलीकडेच आलिया एका टॉक शोमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळेला तिने मुलीबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या. तिने राहाला १८ व्या वाढदिवसाला कोणतं गिफ्ट देणार याची माहिती दिली आहे.
“मी एकदा माझ्या आईकडून ऐकलं होतं, आई-वडील त्यांच्या आयुष्यात खूप बिझी असतात, त्यामुळे मुलांशी बोलायचं बरंच काही राहून जातं, आणि त्याची खंत नंतर वाटते.”
56
राहासाठी आलिया काय करते?
राहासाठी आलिया रोज मेल लिहून ठेवत असते, त्यामुळं तिला भविष्यात काय हवं काय नको ते आलियाला समजत जाईल. तो मेल कधी मोठा नसतो कधी फक्त एक ओळ,तर कधी एखादा फोटो असतो.
66
आलियासाठी एक पुस्तक लिहिणार
हे सगळे मेल एकत्र करून आलिया राहासाठी एक पुस्तक तयार करणार आहे आणि तेच ती तिच्या 18व्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून देणार आहे, असं आलियाने म्हटलं आहे