अभिनेता चिराग पासवान यांनी 'मिले ना मिले हम' या चित्रपटानंतर बॉलिवूड सोडले. वडील रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा पुढे नेत, ते राजकारणात यशस्वी झाले आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्री आहेत.
चित्रपट फ्लॉप झाला, अपमान सहन केला आणि आता झाला केंद्रीय मंत्री, नाव ऐकून म्हणाल गड्या नशीब घेऊन आलास
सिनेमा क्षेत्रातून आपल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणात करिअर केलं आहे. त्यामध्ये खासकरून कंगना राणावतच नाव आघाडीवर असतं. पण चिराग पासवान यांनी सिनेमात बस्तान न बसल्यामुळं राजकारणात करिअर केलं आणि यशस्वी झाले.
26
बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप झाला म्हणून राजकारणात केली एंट्री
बॉलिवूडमध्ये चित्रपट फ्लॉप झाला म्हणून चिराग पासवान यांनी राजकारणात एंट्री केली. त्यांनी वडील रामविलास पासवान यांचा वारसा राजकारणातून पुढं नेण्याचा प्रयत्न केला.
36
पहिलं कोणत्या चित्रपटात केलं काम
मिले ना मिले या चित्रपटात कंगना राणावत आणि चिराग पासवान यांनी एकत्र काम केलं होत. त्यानंतर कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला आणि चिराग पासवान यांनी प्रवेश केला.
चिराग पासवान यांनी चित्रपट फ्लॉप झाल्यावर राजकारणात एंट्री करण्याचा निर्णय घेतला. चिराग पासवान यांनी त्यानंतर बिहारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात उडी घेतली.
56
चिराग पासवान काय म्हणाले?
चिराग पासवान यांनी सांगितलं की, मी मुंबईत चांगलाच स्थिरावलो होतो. काही वर्ष आणखी काम केलं असते तर मी बॉलिवूडमध्ये स्वतःही नाव कमावू शकलो असतो.
66
चिराग पासवान कोण आहेत?
चिराग पासवान हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे सुपुत्र आहेत. चिराग हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले.