'केवळ 4 तास झोपायचा', Chandu Champion सिनेमासाठी कार्तिक आर्यनने अशी केली तयारी

अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा चंदू चॅम्पियन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमासाठी कार्तिकने फार मेहनत केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

Chanda Mandavkar | Published : Jun 7, 2024 2:17 AM IST / Updated: Jun 07 2024, 07:50 AM IST

Chandu Champion Movie : बॉलिवूडमधील अभिनेता कार्तिक आर्यनने त्याचा आगामी सिनेमा ‘चंदू चॅम्पियन’ साठी कठोर परिश्रम केल्याची बाब कोणापासून लपलेली नाही. सिनेमासाठी सातत्याने मेहनत करण्यासह आपल्या लाइफस्टाइलमध्येही कार्तिक आर्यनने बदल केला होता. यामुळेच कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियनची भूमिका उत्तम पद्धतीने साकारता आलीय.

कार्तिकचे ट्रान्सफॉर्मेशन
सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी कार्तिकने केलेल्या मेहनतीबद्दलच्या काही गोष्टी सांगत त्याचे कौतुकही केले आहे. कबीर खान यांनी म्हटले की, सिनेमाच्या शूटिंगआधी कार्तिने मला सांगितले होते मी केवळ चार तासच झोपतो. पण चंदू चॅम्पियनसाठी हेल्दी लाइफस्टाइल आणि सवयी फॉलो कराव्या लागलीत असे आधीच कार्तिकला सांगण्यात आले होते. खरंतर, सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आताही कार्तिक आर्यन हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करतोय.

खरंतर, कार्तिक आर्यनच्या सवयींमध्ये बदल न केल्यास चंदू चॅम्पियन सिनेमा तयार करणे व्यर्थ आहे. एका मुलाखतीत कबीर खान यांनी म्हटले की, ज्यावेळी मी कार्तिकला भेटलो तेव्हा तो इन्सोन्मिया आजाराचा सामना करत होता. तो केवळ चारच तास झोपायचा. पण सिनेमा दमदार व्हावा म्हणून त्याला आठ तास झोपण्यासाठी सल्ला दिला. अशातच कार्तिकने आपल्या काही गोष्टींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

कबीर खान यांनी कार्तिकचे केले कौतुक
कबीर खान यांनी म्हटले की, कार्तिकने मला म्हटले हो त्याला नैसर्गिक पद्धतीने आपल्यामध्ये आयुष्यात काही बदल करायचे आहेत. हीच गोष्ट कार्तिकने सत्यात उतरवून दाखवली. कोणतेही स्टेरॉइड्स न घेता त्याने आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले. कार्तिकच्या शेड्यूलचा सातत्याने ट्रॅक ठेवला जात होता. गेल्या दीड वर्षांपासून कार्तिक एका एथलीटचे आयुष्य जगतोय.

कार्तिकसाठी फिजिकल ट्रेनर, फिजियोथेरपिस्ट, डाएटीशियन, बॉक्सिंग कोच, स्विमिंग कोच आणि कुस्तीपटु देखील ठेवला होता. एक मोठी टीम तयार केली होती. गेल्या दीड वर्षांपासून कार्तिक एक एथलीट प्रमाणे राहतोय. सकाळी लवकर उठणे, जिमला जाणे, हेल्दी फूड अशा सर्वकाही गोष्टी कार्तिक सध्या करतोय. दरम्यान, कार्तिकचा चंदू चॅम्पियन सिनेमा येत्या 14 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची कथा मुर्लीकांत पेटकर यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. मुर्लीकांत हे पहिलेच भारतीय पॅरालिंपिक गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत.

आणखी वाचा : 

तनीषा मुखर्जीच्या फ्लॉप करियरमागे काजोलचा हात? अभिनेत्री म्हणते...

'जवान' चा रेकॉर्ड ब्रेक करणार 'Kalki 2898AD'? जाणून घ्या सिनेमा पाहण्याची 5 कारणे

Share this article