Published : Jun 30, 2025, 01:31 PM ISTUpdated : Jun 30, 2025, 01:32 PM IST
मुंबई - २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर छावाचाच दबदबा बघायला मिळतोय. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये छावाने आपले स्थान कायम ठेवले आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला या वर्षातील टॉप १० सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल माहिती देणार आहोत.
२०२५ चा आतापर्यंतचा सर्वात कमाई करणारा चित्रपट छावा आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने ७८३ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यात सर्वाधिक व्यवसाय महाराष्ट्रात झाला. म्हणजेच मराठी थीमवर चित्रपट केला तर महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि तो देश पातळीवरही हीट ठरतो हे यात दिसून येते.
210
या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट अक्षय कुमारचा मल्टीस्टारर 'हाउसफुल ५' आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २२८.३१ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा कॉमिक चित्रपट होता. यात मराठी कलाकार रितेश देशमुख आणि श्रेयश तळपदेही होता.
310
अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूरचा 'रेड २' नेही यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपटाने २२२ कोटींचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे यातही रितेश देशमुख होता. त्यामुळे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकांच्या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.
सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा फ्लॉप चित्रपट 'सिकंदर' देखील या यादीत आहे. चित्रपटाने १७६.१८ कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट फारसा चालला नाही. पण सलमान खानला बघायला आलेल्या प्रेक्षकांमुळे एवढा पल्ला गाठता आलाय.
510
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने आतापर्यंत १६२.५८ कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख होती. तसेच या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी काम केले आहे.
610
अक्षय कुमार आणि वीर पहडियाचा 'स्काय फोर्स' यावर्षी १०० कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. चित्रपटाने १४४ कोटींचा व्यवसाय केला. हा भारतीय वायूदलावर आधारीत चित्रपट होता.
710
अक्षय कुमार आणि अनन्या पांडेचा 'केसरी चैप्टर २' देखील या यादीत आहे. चित्रपटाने १४२ कोटींचा व्यवसाय केला आहे.
810
सनी देओलचा धमाकेदार अॅक्शन चित्रपट 'जात' नेही यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने ११२ कोटींचा व्यवसाय केला आहे.
910
राजकुमार राव आणि वामिका गब्बीचा 'भूल चूक माफ' देखील या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाने ९०.७८ कोटींचा व्यवसाय केला.
1010
जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' देखील २०२५ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाने ५३ कोटींची कमाई केली आहे.