बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा मायदेशी परतली आहे. गुरुवारी (26 ऑक्टोबर 2023) रात्री उशीरा ती मुंबई दाखल झाली. नेहमीप्रमाणे यावेळेसही मुंबई विमानतळावर तिचा स्टायलिश लुक पाहायला मिळाला. मॉडर्न लुक कॅरी करत तिनं गळ्यामध्ये एक सुंदर नेकलेस घातले होते. मंगळसूत्राप्रमाणे दिसणाऱ्या या नेकलेसनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या डिझाइनर नेकलेसबद्दलची स्पेशल गोष्ट जाणून घेऊया.
प्रियंका चोप्रा गुरुवारी रात्री उशीरा मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळेस तिचा हॉट व सुंदर लुक पाहायला मिळाला. प्रियंकाने काळ्या रंगाच्या ब्रालेट टॉपसह ओव्हर साइझ्ड जॅकेट कॅरी केले होते. यावर तिनं करड्या रंगाची पँट मॅच केली होती. प्रियंकाचा हा लुक खूपच कूल व स्टायलिश दिसत होता.
विशेष म्हणजे प्रियंकाने या मॉडर्न लुकसह गळ्यात एक स्पेशल नेकलेस घातले होते. पण नेकलेसमध्ये पती निक जोनस नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीच्या नावाचे पेंडेंट होते. तिच्या या खास नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
हिरेजडित व काळ्या मण्यांच्या असलेल्या या स्पेशल नेकलेसमध्ये प्रियंकाची लाडकी लेक मालतीच्या नावाचे पेंडेंट पाहायला मिळाले. सोशल मीडियावर सध्या प्रियंका चोप्राच्या याच खास नेकलेसची चर्चा सुरू आहे.
55
जिओ मामी फेस्टिव्हलमध्ये होणार सहभागी
प्रियंका चोप्रा जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात परतली आहे. इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करत तिनं मायदेशी येत असल्याची माहिती दिली होती. अलिकडेच प्रियंका चोप्रा हॉलिवूड वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये दिसली होती आणि लवकरच ती ‘हेड्स ऑफ स्टेट्स’ व ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू’ या सिनेमांमध्येही दिसणार आहे.