आलिया भटने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘रणबीर कपूरला मी लिपस्टिक लावणं आवडत नाही. लिपस्टिक लावल्यास तो मला पुसण्यास सांगतो.’
Image credits: Getty
Marathi
रणबीर कपूरला केले ट्रोल
आलियाने शेअर केलेल्या या माहितीनंतर सोशल मीडियावर लोक रणबीरला टॉक्सिक पती म्हणत ट्रोल करू लागले.
Image credits: Getty
Marathi
रणबीरनं सोडले मौन
रणबीरने या टीकेबाबत आपले मौन सोडले असून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
Image credits: Getty
Marathi
रणबीर कपूरची प्रतिक्रिया
“मी सोशल मीडियावर नाहीय आणि ही एक चांगली बाब आहे. कारण मला नकारात्मक गोष्टींचा सामना करण्याची आवश्यकता भासत नाही”.
Image credits: Getty
Marathi
‘नकारात्मकताही गरजेची’
जर आपण एक आर्टिस्ट असाल तर नकारात्मकताही आवश्यक आहे. कारण तेव्हाच समतोल राखता येतो, असेही मत त्यानं मांडलं.
Image credits: Getty
Marathi
'प्रत्यक्षात मी असा नाही'
“कित्येकदा अनेक गोष्टी लिहिल्या जातात. अनेक जण स्वतःचे मत तयार करतात. सिनेमांत साकारलेले पात्र किंवा मीडियामुळे तयार झालेल्या प्रतिमेप्रमाणे मी नाही. प्रत्यक्षात मी तसा नाहीय.”
Image credits: Getty
Marathi
रणबीर आहे टॉक्सिक?
अलिकडेच मी टॉक्सिक असल्यासंदर्भातील काही लेख वाचले. जे मी केलेल्या विधानाशी संबंधित होते.
Image credits: Getty
Marathi
लढाईसाठी माझा चेहरा वापरायचाय?
जे टॉक्सिक लोकांविरोधात लढताहेत, मी त्यांच्यासोबत आहे. या लढाईसाठी त्यांना माझा चेहरा म्हणून वापर करायचाय, तर ठीक आहे. हरकत नाही. कारण मला वाईट वाटण्यापेक्षा ही लढाई मोठी आहे.