India vs AUS : शाहरुख खानने आशा भोसलेंचा वापरलेला कप उचलला, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

India vs AUS : वर्ल्ड कप स्पर्धा 2023चा अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख खानचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

 

Harshada Shirsekar | Published : Nov 20, 2023 12:07 PM IST / Updated: Nov 20 2023, 06:10 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत (World Cup 2023 Final Match) भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टीममध्ये अंतिम सामना खेळला गेला. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी मोठे-मोठे सेलिब्रिटी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पोहोचले होते. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील मॅच पाहण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत येथे दाखल झाला होता. 

वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले असले तरीही सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनी खेळाडूंना कशा पद्धतीने प्रोत्साहन देत त्यांचे मनोधैर्य वाढले, हे सर्वांनीच पाहिले आहे. एकीकडे हे सारं काही घडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर किंग खानचा स्टेडिअमवरील व्हिडीओ सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर चाहत्यांकडून केवळ कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

SRKने उचलला आशा भोसले यांचा वापरलेला कप

संपूर्ण सामन्यादरम्यान शाहरुख खानवर अनेकदा कॅमेरे रोखण्यात आले. नेटिझन्स देखील स्टेडिअमवरील त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. टीम इंडियाला 'चक दे' भाषणाची गरज असल्याचेही काहींनी म्हटले. यादरम्यान सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. स्टेडिअममध्ये शाहरुख खान आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले शेजारी-शेजारी बसले होते. 

आशा भोसले यांचा चहा पिऊन झाल्याचे लक्षात आल्यानंतर किंग खानने स्वतः त्यांच्या हातातील वापरलेला कप उचलला व तेथील कर्मचाऱ्याच्या हातात नेऊन दिला. आशा भोसलेंना अशा प्रकारे मदत केल्याबद्दल नेटिझन्सकडून शाहरुख खानवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

 

VIDEO : शाहरुख खानने अभिनेता आयुष्मान खुरानालाही प्रेमाने मारली मिठी 

शाहरुख खानने लिहिली एक खास पोस्ट

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर शाहरुख खाने खेळाडूंसाठी एक खास पोस्ट लिहिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं म्हटलं की, “भारतीय संघ ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेत खेळला आहे, ती सन्मानाची बाब आहे. स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन वाईट दिवस असतातच. आपण सामना जिंकू शकलो नाही, पण टीम इंडिया धन्यवाद”.

आणखी वाचा :

Nana Patekar : चाहत्याला मारल्याचा VIDEO VIRAL, नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी; म्हणाले…

IND vs AUS World Cup Final 2023 : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकली World Cup Trophy, टीम इंडियाचं स्वप्न भंगलं

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला का करावी लागली प्रेग्नेंसी टेस्ट ?

Share this article