Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला का करावी लागली प्रेग्नेंसी टेस्ट ?

Published : Nov 16, 2023, 04:49 PM IST
Ankita Lokhande Pregnant Bigg Boss 17

सार

Ankita Lokhande Pregnancy Test : बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या रिअ‍ॅलिट शोमध्ये बरेच काही पाहायला मिळत आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर आलीय ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडेला प्रेग्नेंसी टेस्ट करावी लागली, कारण… 

Ankita Lokhande Pregnancy Test News : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला बिग बॉस 17 (Bigg Boss 17) हा रिअ‍ॅलिटी शो सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे बराच चर्चेत आहे. शोमधील स्पर्धक एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याव्यतिरिक्त बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) त्यांच्या नातेसंबंधांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

गुरुवारच्या (16 नोव्हेंबर 2023) एपिसोडमध्ये अंकिताला शॉवरमधून बाहेर काढण्याबद्दल बिग बॉस विकीला चिडवत असल्याचे पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे विकीने खानजादीचे कपडे प्रेस करण्यात तिला मदत केल्याचीही माहिती बिग बॉसने सर्वांसमोर सांगितली. यावरून अंकिता अधिक नाराज झाल्याचे प्रोमोमध्ये दिसलं. पण गुरुवारच्या एपिसोडमध्ये अंकिता स्वत:बद्दलचे एक मोठे रहस्यही उघड करणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.

अंकिता लोखंडेची मासिक पाळी चुकली

बिग बॉस 17 या रिअ‍ॅलिटी शोच्या बुधवारी (15 नोव्हेंबर) प्रक्षेपित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले की. अंकिता लोखंडे गार्डन एरियामध्ये बसून पती विकी जैनसोबत संवाद साधत होती आणि यावेळेस दोघांमध्ये बऱ्याच विषयांमुळे वादही झाले. यानंतर दोघे घरात येतात व काही गोष्टींवर पुन्हा चर्चा करतात.

अंकिताने खानजादीसमोर अपमान केल्याने विकीने पत्नी अंकितासमोर नाराजी व्यक्त केली. यावर अंकिताने म्हटलं की, “मी थकलेय. मी खरंच मानसिकरित्या थकलेय. मला असं वाटतंय मी आजारी आहे. मी ठीक नाहीय. मला पीरियड्स येत नाहीये, मला घरी जायचंय”. यावर विकी अंकिताला म्हणाला की, तू तर सांगितलं की तुझा पीरियड्सचा पहिला दिवस आहे. यावर पुन्हा अंकिता-विकीमध्ये भांडणं झाली.

अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी टेस्ट

अंकिता लोखंडेने पती विकीला सांगितलं की, "पीरियड्स न आल्याने प्रेग्नेंसी तपासण्यासाठी ब्लड टेस्ट केली आहे. मेडिकल रिपोर्ट आले नाहीत. पण त्याच दिवशी युरिन टेस्ट देखील केली”. याचदरम्यान विकीने खेळाचा विषय काढल्याने ती पुन्हा त्याच्यावर रागवते. पुन्हा दोघांमध्ये वाद-भांडणे होतात. विकी हवा तसा वेळच देत नसल्याने अंकिता खूप अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे आणि यावरूनच दोघांमध्ये सतत वाद घडताहेत.

अंकिता-विकीमध्ये सतत होत असतात भांडण VIDEO

 

आणखी वाचा :

कातिल अदा! हास्यजत्रा फेम शिवानी परबचा स्पेशल DIWALI 2023 LOOK, चाहते झाले फिदा

कोण आहे ORRY? ज्याची अंबानींपासून ते बॉलिवूडकरांसोबत आहे खास मैत्री

शाहरुख, दीपिकाचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?

 

 

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला