Nana Patekar : चाहत्याला मारल्याचा VIDEO VIRAL, नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी; म्हणाले…

Nana Patekar News : अभिनेते नाना पाटेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला त्यांनी मारल्याचे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे.

Nana Patekar News : बॉलिवूड (Bollywood) व मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाराणसीमध्ये आपला आगामी सिनेमा 'जर्नी' (Journey Movie) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नानांनी (Actor Nana Patekar Slapped Fan) एका चाहत्याला जोरदार थप्पड लगावल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

हा चाहता नानांसोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला तेव्हा नानांनी संतापून त्याला मारले. नानांचे हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले आहे (Nana Patekar Misbehaved With Fan) आणि आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. चहुबाजूंनी टीका होत असल्याने नाना पाटेकर यांनी या संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचे काम केले आहे.

नाना पाटेकर सध्या अनिल शर्मा दिग्दर्शित ‘जर्नी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. बापलेकाच्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये अभिनेता उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील एका सीनचे चित्रिकरण करण्यासाठी नाना येथील बाजारपेठेत दाखल झाले होते. यादरम्यान एक चाहता नानांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. याच कारणामुळे संतापून नानांनी त्याला थप्पड लगावल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नाना पाटेकर म्हणाले, 'हे चुकून घडलंय… '

"जे घडले ते गैरसमजातून घडलंय. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारल्याचे दिसत आहे. पण हा आमच्या चित्रपटातील एका सीनचा भाग होता. ज्याची आम्ही रंगीत तालीमही केली होती. 

मागून एक माणूस येतो आणि म्हणतो, ‘ऐ बुढ़ऊ! टोपी बेचनी है’, मी त्याला पकडून मारतो आणि उद्धटपणा करू नकोस, सभ्यपणे वाग; असे सांगतो... आणि मी तो तेथून पळून जातो. या सीनची रंगीत तालीम झाली होती. पण दिग्दर्शकाने हा सीन पुन्हा एकदा करून असे म्हटले.

‘मी फोटोसाठी कधीही नकार दिलेला नाही…’

पुढे नाना असे म्हणाले की, ‘आम्ही चित्रिकरणाला सुरुवात करतच होतो. इतक्यात एक मुलगा सीनसाइटवर आला. मला वाटले तो आमच्याच टीममधला एकजण आहे आणि मी सीनप्रमाणे त्याला मारले. नंतर समजले की तो मुलगा आमच्या टीममधला नव्हताच. आम्ही त्याला बोलावण्यासाठी गेलो, पण तो तेथून पळाला होता. पण मी कधीही फोटो काढण्यासाठी कोणत्याही चाहत्याला नकार दिला नाही. 

"घाट परिसरात इतकी गर्दी होती आणि हा सीन बाजारपेठेत चित्रित करण्यात येत होता. आता हे चुकीने घडलंय. मी आमचा माणसू समजून सीन केला, काही गैरसमज झाला असेल तर माफ करा. मी अशा प्रकारे कोणालाही मारत नाही. आजवर मी असे कधीच केले नाही."

दरम्यान सध्या हे प्रकरण शांत व्हावे, यासाठी निर्माते व नानांकडून तयार केलेली ही स्क्रीप्ट असल्याचे सोशल मीडियावरील युजर्संना वाटत आहे.

आणखी वाचा :

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला का करावी लागली प्रेग्नेंसी टेस्ट ?

कातिल अदा! हास्यजत्रा फेम शिवानी परबचा स्पेशल DIWALI 2023 LOOK, चाहते झाले फिदा

धक्कादायक! अभिनेत्रीचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Share this article