मल्याळम अभिनेत्री रेंजुशा मेननने जगाचा निरोप घेतला आहे. राहत्या घरामध्ये या 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह सोमवारी (30 ऑक्टोबर 2023) संशयास्पदरित्या आढळला.
Image credits: Instagram
Marathi
कुठे राहत होती अभिनेत्री?
रिपोर्ट्सनुसार, रेंजुशा मेनन तिरुवनंतपुरममधील श्रीकार्यम येथे परिवारासह एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. याच घरात तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
Image credits: Instagram
Marathi
मृत्यूची बातमी कशी आली समोर?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी उशीरापर्यंत रेंजुशा रूममधून बाहेर न आल्यानं कुटुंबीयांना संशय आला. बऱ्याच प्रयत्नानंतर दरवाजा उघडला गेला तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता.
Image credits: Instagram
Marathi
पोलीस करताहेत तपास
रेंजुशाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोस्टमार्टेमसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. पण तिच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
Image credits: Instagram
Marathi
रेंजुशाची कारर्कीद
रेंजुशा मेननने मल्याळम सिनेमा आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका निभावली आहे. पण 'अनंदारागम' या कार्यक्रमामध्ये ती प्रमुख भूमिका साकारत होती.
Image credits: Instagram
Marathi
गाजलेले टीव्ही शो व सिनेमे
रेंजुशा मेननने ‘एंथे मथावु’, 'मिसेस हिटलर' यासारख्या टीव्ही शोमध्ये जबरदस्त भूमिका निभावली होती. 'सिटी ऑफ गॉड' व 'मेरिककुंदोरू कुंजदू' यासारख्या सिनेमांमध्येही तिनं अभिनय केलाय.