Bigg Boss 18 च्या सेटवरुन सलमान खानची पहिली झलक समोर

Published : Sep 06, 2024, 11:20 AM IST
salman khan first photo from bigg boss 18

सार

Bigg Boss Season 18 Updates : बिग बॉसच्या सीजन 18 ची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. शो चे सूत्रसंचालन सलमान खानच करणार असून सेटवरील त्याची पहिली झलक समोर आली आहे.

Bigg Boss Season 18 Updates : सलमान खानचा सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस 18 सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी शो संदर्भातील नवे अपडेट्स समोर येत आहेत. अशातच सलमान खानची बिग बॉसच्या सेटवरील पहिली झलक समोर आली आहे. दरम्यान, याआधी आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये दावा केला होता की सलमान खान शो चे सूत्रसंचालन करणार नाही. पण सेटवरील फोटो समोर आल्यानंतर सलमान खानसंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पहिल्या प्रोमो शूटसाठी पोहोचला सलमान बिग बॉस 18 च्या सेटवरुन व्हायरल झालेल्या फोटोबद्दल असे सांगितले जात आहे की, सलमान खान शो चा पहिला प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी सलमान खानने काळ्या रंगातील कोटसह फॉर्मल आउटफिट्स परिधान केले होते. सलमानचा सेटवरील फोटो पाहून प्रेक्षक शो सुरु होण्याची आतुरने आता वाट पाहत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांकडून लवकरच बिग बॉस 18 चा पहिला प्रोमो जाहिर केला जाईल. दरम्यान, सलमान त्याचा आगामी सिनेमा सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या शूटिंगवेळी सलमानला दुखापतही झाली होती. तरीही सलमान खान शो चा प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता.

कधी सुरू होणार बिग बॉस 18?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 18 चा सीजन ऑक्टोंबर महिन्याच्या 5 तारखेपासून सुरु होणार आहे. निर्मात्यांकडून शो च्या प्रीमियर लाँचची जोरदार तयारी केली जात आहे. शो चा पहिला प्रोमो पुढील आठवड्यात रिलीज होण्याचा अंदाज आहे. शोमधील स्पर्धकांबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बिग बॉस 18 च्या घरातील संभाव्य स्पर्धक
सलमान खानच्या बिग बॉस 18 शो मध्ये काही संभाव्य स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये धीरज धूपर, अंजली आनंद, रिम शेख, जन्नत जुबैर, सुधांशु पांडे, शाहीर शेख, फैसल शेख, समीरा रेड्डी, जान खान, चाहत पांडे, आशीष पवार, सुनील कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. लवकरच निर्मात्यांकडून स्पर्धकांची नावे जाहीर केली जाईल असे सांगितले जात आहे.

 

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!