Anant Ambani-Radhika Merchant च्या लग्नसोहळ्याला सुरुवात, अंबानी परिवाराची वेन्यूच्या येथे शाही एण्ट्री, See Photos
Anant Ambani-Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी परिवार जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय पाहुणेही वेन्यूच्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहेत.
Chanda Mandavkar | Published : Jul 12, 2024 5:36 PM / Updated: Jul 12 2024, 05:39 PM IST
अंबानी परिवार जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल
दुल्हेराजा अनंत अंबानीसह संपूर्ण अंबानी परिवार जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाले आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
अंबानी परिवारासाठी आनंदाचा क्षण
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा अखेर 12 जुलैला पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनची धूम पहायला मिळाली.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहण्यासाठी परदेशातून आलेले पाहुणेही येण्यास सुरुवात झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी प्रत्येकाला इंडियन आउटफिट्सचा ड्रेस कोड कॅरी करण्यास सांगितला आहे.
अंबानींची लेक आणि सूनेचा लूक
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी श्लोका मेहताने गुलाबी रंगातील लेहेंगा परिधान केला आहे. यावर गोल्डन दुपट्टा, चोकर ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपसह लूक पूर्ण केला आहे. याशिवाय इशा अंबानीने पिवळ्या आणि गुलाबी रंगातील शेडमधील लेहेंगा परिधान केला आहे. यावर इशाने डायमंडची ज्वेलरी घातली आहे. अनंतच्या लग्नसोहळ्यासाठी इशा, श्लोकासह मुकेश अंबानींनीही गुलाबी रंगातील शेरवानी घातली आहे.