Netflix ने खरेदी केले अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चे अधिकार, इतक्या कोटींची झाली डील

Published : Apr 12, 2024, 03:24 PM ISTUpdated : Apr 12, 2024, 03:27 PM IST
allu arjun pushpa 2 ott rights buy by netflix f

सार

Allu Arjun Pushpa 2 OTT Rights : अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ‘पुष्पा 2’ सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला. अशातच नेटफ्लिक्सने सिनेमाचे ओटीटी अधिकार खरेद केले आहेत. यासाठी कोट्यावधी रुपयांची डील झाल्याचे बोलले जात आहे.

Pushpa 2 Movie : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा ‘पुष्पा 2’ चा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहिले गेले. याशिवाय चाहत्यांकडून पुष्पा 2 सिनेमाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहिली जात आहे. अशातच सिनेमाचे ओटीटी अधिकार (OTT Rights) नेटफ्लिक्सने (Netflix) खरेदी केल्याचे समोर आले आहे.

रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 सिनेमाच्या ओटीटी अधिकाराचे डील कोट्यावधी रुपयांमध्ये झाले आहे. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेला पुष्पा 2 सिनेमा यंदाच्या वर्षी 15 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाच्या ओटीटी अधिकाराची डील
दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार (Director Sukumar) आपल्या शानदार सिनेमांसाठी ओखळले जातात. सुकुमार यांनी पुष्पा 2 सिनेमाचेही दिग्दर्शन केले आहेत. असे म्हटले जातेय की, निर्मात्यांनी सहा मिनिटांच्या एका सीनसाठी तब्बल 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. याचे शूटिंगही महिनाभर केले जात होते.

सिनेमाचे म्युझिकल आणि हिंदी सॅटेलाइट अधिकार टी सीरिजने 60 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने 100 कोटी रुपयांना पुष्पा 2 सिनेमाचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी केले आहेत. हे अधिकार सालार सिनेमापेक्षा कमी आहेत. कथित रुपात प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाचे (Salar Movie) अधिकार 162 कोटी रुपये आणि ‘आरआरआर’ सिनेमाचे (RRR Movie) अधिकार 350 कोटी रुपयांना विक्री करण्यात आले होते.

कधी प्रदर्शित होणार पुष्पा 2 सिनेमा
अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा 2 सिनेमा येत्या 15 ऑगसटला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून याचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनव्यतिरिक्त रश्मिका मंदाना, साई पल्लवी आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत असणार आहे.

आणखी वाचा : 

देशातील सर्वात श्रीमंत डिरेक्टर तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी उरकला गुपचूप साखरपुडा

नवरात्रीमध्ये Amruta Khanvilkar सारख्या साड्या, होईल देवीची कृपा !

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप