Alibaba ani Chalishitale Chor : आंबट-गोड थोडीशी तिखट, चाळीशीतली मस्ती "गॉसिप" या मराठी चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर

Published : Mar 19, 2024, 12:31 PM ISTUpdated : Mar 19, 2024, 12:39 PM IST
Ali baba Ani Chalishitale chor marathi movie

सार

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकार आणि आगळीवेगळी स्टोरी या चित्रपटुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मार्च रोजी चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकार आणि आगळीवेगळी स्टोरी या चित्रपटुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मार्च रोजी चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे..

सध्या मराठी चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे येत आहे. नवीन विषय आणि नवीन संकल्पना प्रेक्षकांना देखील पसंतीस पडत आहेत.लहानपणी प्रत्येकानेच अली बाबा आणि चाळीस चोर हि गोष्ट ऐकली असेलच. मात्र हेच शीर्षक घेऊन "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" हे नाव थोडं भन्नाट वाटत. नाव तर भन्नाट आहेच तसं चित्रपटाचीही स्टोरी भन्नाट आहे यात शंका नाही. येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.

सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे या कलाकारांची धमाल ट्रेलर मधून पाहायला मिळाली आता हि धमाल प्रत्यक्ष मोठ्या पडद्यवर पाहायला आणखीण मजा येणार आहे. ट्रेलर पाहता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर आपल्याला २९ मार्चला मिळणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो आणि मग सुरू होतो ‘एक्साईटमेंट’ शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे.”

आणखी वाचा :

तीन सुना मिळून शोधताय परफेक्ट सासू! ‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीवर 10 वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मालिकेने घेतला निरोप...

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने पार्टीसाठी सापाचे विष पुरवत असल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप