आलिया भट आणि रणबीर कपूर दिवाळीत त्यांच्या २५० कोटी रुपयांच्या नवीन घरात गृहप्रवेश करणार आहेत. मुंबईतील पाली हिल येथील या अलिशान बंगल्यात रणबीरची आई नीतू कपूर आणि मुलगी राहा देखील राहणार आहेत.
मुकेश अंबानींच्या घराला भारी पडेल असं 'या' सेलिब्रेटींचे घर तयार, दिवाळीचा जश्न जल्लोषात होणार साजरा
आलीया भट आणि रणबीर कपूर हे दोघेही त्यांची दिवाळी नवीन घरात साजरी करणार आहेत. मुंबईतील पाली हिल परिसरात सुरु असलेल्या बंगल्याचे बांधकाम काही काळापासून सुरु आहे.
26
दोघांचं सर्वात महागडं घर
या दोघांचं हे सर्वात महागडे घर असून त्यांची श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये गणना व्हायला सुरुवात झाली आहे. या घराची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल २५० कोटी रुपये आहे. त्यामुळं आता प्रेक्षकांना या घराबद्दल प्रतीक्षा लागून राहिली आहे.
36
निवेदनात दोघे काय म्हणाले?
दोघांनी एकत्र निवेदन देताना म्हटले आहे की, दिवाळी म्हणजे कृतज्ञता आणि नवीन सुरुवात. आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश करत असताना तुमच्या प्रेम आणि पाठींब्याबद्दल आभारी आहोत.
मुंबईतील सहा मजली बांगला कपूर कुटुंबाच्या पूर्वीच्या घराच्या जागेवर बंगला बांधला आहे. या अलिशान घरात टेरेस गार्डन्सपासून ते अलिशान इंटेरिअर आणि आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आहे.
56
या बंगल्याची किंमत २५० कोटी रुपये
या बंगल्याची किंमत २५० कोटी रुपये आहे. या बंगल्यामध्ये रणबीर, आलिया यांच्यासोबत त्यांची मुलगी राहा राहणार आहे. रणबीरची आई नितु कपूर या बंगल्यामध्ये राहणार आहेत.
66
घर खास का आहे?
घरातील एक खोली रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना समर्पित करण्यात आलं आहे. येथे ऋषी कपूर यांची पुस्तके, त्यांची आवडती खुर्ची, वार्डरोब अशी त्यांची आठवण करून देणाऱ्या वस्तू ठेवल्या आहेत.