अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी उरकला गुपचूप साखरपुडा

Published : Apr 10, 2024, 12:25 PM IST
Ambar-Ganpule-and-Shivani-Sonar

सार

अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असून दोघांनीही साखरपुड्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका चांगलीच गाजली होती.रंग माझा वेगळा’मधील आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुले आणि 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतील सिंधुताई सपकाळ यांची भूमिका करणारी शिवानी सोनार या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काल गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर (९ एप्रिल) रोजी अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या.

साखरपुड्याचे फोटो शेअर करत शिवानीने लिहिलं आहे, “अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे. #Ambani.” शिवानी व अंबरने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात पाहायला मिळाली. तर अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. शिवानी व अंबर खूपच सुंदर दिसत होते.

राजा राणीची गं जोडी मालिकेतून घराघरात पोहोचली शिवानी :

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ आता ऑफ एअर गेली असली, तरी या मालिकेतील कलाकार काही ना काही कारणाने चर्चेत आहेत. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार ही घराघरात लोकप्रिय झाली होती. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत शिवानी सोनार हिने ‘संजीवनी ढाले पाटील’ ही भूमिका साकारली होती.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव :

शिवानी आणि अंबर एकमेकांना डेट करत होते, याबद्दल कुणालाही फारशी माहिती नव्हती. आता साखरपुड्याचा एक छोटासा व्हिडीओ शेअर करून शिवानी सोनारने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिवानी आणि अंबर यांचे साखरपुड्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते आता दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. साखरपुड्यासाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. तर, अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आऊटफिट परिधान केला होता. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत होती.

आणखी वाचा :

मुलीचा आंनद पाहून आईला अश्रू अनावर ! सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई,मायराच्या आईने दिली गोड बातमी !

Snake Venom Case : सापांसाठी वर्च्युअल क्रमांकावरून कॉल करायचा एल्विश यादव, पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!