श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पत्नीने भावूक पोस्टद्वारे शेअर केले हेल्थ अपडेट

Published : Dec 21, 2023, 11:53 AM ISTUpdated : Dec 22, 2023, 11:16 AM IST
Shreyas Talpade

सार

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसच्या पत्नीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

Shreyas Talpade News : मराठी सिनेसृष्टी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला सहा दिवसांनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसची पत्नी दिप्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. 

या पोस्टद्वारे तिने कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्रेयसला डिस्चार्ज मिळाल्याने चाहत्यांचाही जीव भांड्यात पडला आहे.

श्रेयस तळपदेच्या पत्नीची भावूक पोस्ट

दिप्तीने श्रेयससोबतचे आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यास भावूक कॅप्शन दिले. तिने लिहिलं आहे की, ‘माझे आयुष्य… श्रेयस सुखरूप घरी पुन्हा आला आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छिते, मी एकाकडून मदत मागितली पण मदतीचे दहा हात स्वतःहून पुढे आले. देवाच्या रूपाने लोक मदतीसाठी धावून आले. सर्वांचे धन्यवाद.

मी आमच्या सर्व मित्रांचे, कुटुंबीयांचे व सिनेसृष्टीतील सर्वांचे आभार मानते. श्रेयसप्रति प्रेम आणि काळजी व्यक्त केल्याबाबत हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. यातील काही जण माझ्या पाठीशी उभे राहिले. तुमच्या सर्वांमुळेच हे शक्य झाले आहे. त्यावेळेस मी एकटी नव्हते. मला तुम्हा सर्वांचा मोठा पाठिंबा मिळाला. याव्यतिरिक्त दिप्तीने हॉस्पिटलमधील सदस्यांचे आभार मानले.

14 डिसेंबर 2023 रोजी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आणखी वाचा : 

Salaar Trailer 2 : प्रभासच्या 'Salaar' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज, मोठ्या पडद्यावर दिसणार जिवलग मित्रांमधील कट्टर वैर

9th Ajanta-Ellora International Film Festival : सिनेरसिकांना पाहता येणार जगभरातील 55 सर्वोत्कृष्ट चित्रपट

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!