Salaar Trailer 2 : प्रभासच्या 'Salaar' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज, मोठ्या पडद्यावर दिसणार जिवलग मित्रांमधील कट्टर वैर

Published : Dec 18, 2023, 08:51 PM ISTUpdated : Dec 18, 2023, 08:57 PM IST
salaar

सार

Salaar Trailer 2 : अभिनेता प्रभासचा आगामी ‘सालार’ सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Salaar Official Trailer 2 Out : साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित व बहुचर्चित ‘सालार’ सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये खानसारच्या साम्राज्याची झलक दाखवण्यात आली होती. 

तर सोमवारी (18 डिसेंबर 2023) रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता प्रभास खानसारचे साम्राज्य पूर्णपणे नष्ट करण्याची योजना आखत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन मित्रांमधील कट्टर वैर

सिनेमातील कथा दोन जिवलग मित्रांच्या जीवनाभोवती फिरणारी आहे. लहानपणापासूनचे पक्के मित्र एकमेकांचे कट्टर वैरी कसे होतात? याची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच दोन मित्रांची भूमिका ‘प्रभास’ आणि ‘पृथ्वीराज सुकुमारन’ साकारत आहेत. सालार सिनेमाचा नवा ट्रेलर अंगावर शहारे आणणार आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री श्रुती हासनचीही झलक तिच्या चाहत्यांना दिसली.

सुलतानसाठी काहीही करू शकतो सालार

ट्रेलरच्या सुरुवातीस एका व्यक्तीचा केवळ आवाज ऐकू येत आहे. तो म्हणतोय की, “लहानपणी मी तुला एक गोष्ट सांगायचो. पर्शियन साम्राज्याच्या सुलतानसमोर कितीही अडथळे निर्माण झाले, तरी तो आपल्या सैन्याला काहीही न कळवता केवळ एकाच माणसाला याची माहिती देत असे.

सुलतान ज्या गोष्टी मागायचा, तो त्याला आणून देत असे आणि ज्या नकोत, त्या गोष्टी तो नष्ट करायचा”, अशा पद्धतीचा संवाद ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो आहे. ट्रेलरमध्ये केवळ अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे.

सिनेमा कधी होणार रिलीज ?

KGF सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने ‘सालार’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमामध्ये अभिनेता प्रभाससह अभिनेत्री श्रुति हासनचीही मुख्य भूमिका आहे. यासह जगपती बाबू, मिनाक्षी चौधरी, टिनू आनंद, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, गरुड राम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रवी बसरूर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तर इतकी मोठी स्टार कास्ट असणारा हा बहुचर्चित सिनेमा येत्या 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमासोबत होणार टक्कर

सालार सिनेमा सप्टेंबर महिन्यामध्ये बॉक्सऑफिसवर झळकणार होता. पण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तेलुगु, कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतही हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.

दुसरीकडे शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ सिनेमा 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर या दोन्ही सिनेमाची टक्कर पाहायला मिळणार आहे.

‘सालार’ सिनेमातील भूमिकेबाबत प्रभास म्हणाला की…

प्रभासने सिनेमाबाबतची माहिती देताना म्हटले होते की, "सालार सिनेमामध्ये भावनिक दृश्यांसह अ‍ॅक्शनही पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी मला याआधी अशी व्यक्तिरेखा साकारताना पाहिले नाही. या सिनेमाद्वारे त्यांना मी एका नव्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे".

यामुळे चाहतेही सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा

9th Ajanta-Ellora International Film Festival : सिनेरसिकांना पाहता येणार जगभरातील 55 सर्वोत्कृष्ट चित्रपट

Bollywood Update : दबंग सलमान खानच्या हिरोईनला जीवे मारण्याची धमकी? नेमके काय आहे सत्य

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

 

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!