अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.तसेच आणखी काही प्रकरणामुळे पण राज कुंद्रा कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. जाणून घ्या त्यांच्या विषयीच्या 10 गोष्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर सक्तवसुली संचालनालयानं ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.यामध्ये शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.त्यामुळे राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राज कुंद्रा ब्रिटीश नागरिक : राज कुंद्रा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राज यांचा जन्म झाल्याने ते ब्रिटीश नागरिक आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेकांना माहितं नाही की राज कुंद्रांचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पूर्वाश्रमीच्य पत्नीच नाव हे कविता आहे.2009 मध्ये राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलीना नावाची एक मुलगी आहे.
राज आणि शिल्पाची पहिली भेट 2007 साली झाली. याच वर्षी शिल्पाने सेलिब्रिटी बिग बॉस हा शो जिंकला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे दोघे पहिल्यांदा भेटले.
शिल्पा आणि राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केलं.राज कुंद्राची पूर्वाश्रमीची पत्नी कविताने 2007 मध्ये शिल्पावर काही आरोप केले होते. राज आणि मी विभक्त होण्याचं कारण हे शिल्पा असल्याचं कविताने सांगितलं होतं.त्यानंतर राज कुद्रांनी सगळ्यांसमोर येऊन शिल्पाची जाहिरपणे माफी मागितली. एवढंच नाही तर ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे राजने सांगितले होते.
2013 च्या आयपीएलदरम्यान सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राज कुद्रांची चौकशी केली होती.2013 साली आयपीएल सट्टेबाजी प्रकरणावरून राजस्थान रॉयल्सचे सह-मालक राज कुंद्रा यांचे निलंबन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या नवी दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता.
2017 मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केलेला. त्यामुळेच राज कुंद्रांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं.
2021 अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं.
शिल्पा आणि राज अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत असतात. अनेकदा शिल्पा आणि राज हे वेगवेगळ्या कारणांसाठी आणि सोशल नेटवर्किंगवरील पोस्टसाठी चर्चेत असल्याचं दिसून येतं