अमीर खानच्या ''सितारे जमीन पर'' चित्रपटाची पहिल्या दिवशी केवळ 11.5 कोटी कमाई

Published : Jun 21, 2025, 10:30 AM ISTUpdated : Jun 21, 2025, 12:32 PM IST
aamir khan film sitare zameen par screening bollywood celebs attend the event

सार

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ ची प्रेरणा घेऊन सामाजिक संदेश अधिक ठळकपणे मांडला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लाल सिंग चड्डा या चित्रपटापेक्षा याला कमी प्रतिसाद मिळाला आहे.

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ या भावनिक चित्रपटाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये सामाजिक संदेश अधिक ठळकपणे मांडण्यात आला आहे. आमिर खान आणि दिग्दर्शक आर.एस. प्रसन्न यांनी विशेष पाहुण्या कलाकारांना संधी दिली असून, विशेषतः विविध शारीरिक व बौद्धिक क्षमतांच्या व्यक्तींविषयी जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची ओपनिंग 11.5 कोटींची झाली असून लाल सिंग चड्डा पेक्षा कमी झाली आहे. अमीर खानचा आधी आलेला लाल सिंग चड्डा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.7 कोटींची झाली होती. त्यामानाने हा चित्रपट चांगला चालला नाही.

चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजमाध्यमांवर विशेषतः ट्विटरवर चित्रपटाचे कौतुक होत आहे. कथानकाची भावनिक मांडणी, संवेदनशील हाताळणी आणि आमिर खान व जेनेलिया यांचा प्रभावी अभिनय या चित्रपटाला विशेष उंचीवर घेऊन जात आहे. त्यामुळे चित्रपटाने लोकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

कथानकावर नव्याने दिलेला भर ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ या जुन्या चित्रपटाच्या भावनिक सूत्रांवर आधारित असला, तरी त्यामध्ये समाजासाठी अधिक ठळक आणि विचारप्रवृत्त करणारा संदेश दिला आहे. आमिर खान आणि दिग्दर्शक आर.एस. प्रसन्न यांनी यामध्ये काही विशेष पाहुण्या कलाकारांना स्थान दिले असून, वेगवेगळ्या क्षमतांच्या व्यक्तींप्रती समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेक्षकांची सकारात्मक प्रतिक्रिया चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजमाध्यमांवर या चित्रपटाबाबत चांगले अभिप्राय उमटत आहेत. या चित्रपटातील भावना, मनाला भिडणारे प्रसंग आणि आमिर–जिनेलेचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवतो आहे. चित्रपटाने अनेकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे.

आकडेवारीनुसार वाढती पसंती चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तिकिटांची मागणी अचानक वाढली. शेवटच्या काही तासांमध्ये 10,000 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली. ही आकडेवारी पाहता, पुढील काही दिवसांत चित्रपटाला 'माऊथ पब्लिसिटीचा'चा फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लोक एकमेकांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.

चित्रपटाच्या पुढील यशाची वाटचाल ‘सितारे जमीन पर’ ने 11.5 कोटी रुपयांची पहिल्या दिवसाची सुरुवात केली आहे. परंतु, हा प्रवास पुढे किती टिकतो, हे येत्या शनिवार–रविवारी स्पष्ट होईल. चित्रपट तोंडी प्रसिद्धीवर आधारित असल्याने प्रेक्षकांकडून येणारा प्रतिसादच त्याच्या यशाचे खरे मोजमाप ठरेल. प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील असेच मत व्यक्त केले आहे.

‘दंगल’ – प्रेरणादायक संघर्षाची कहाणी 

2016 मध्ये आलेला ‘दंगल’ हा चित्रपट भारतीय कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगट यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात अमिरने महावीर फोगट या कठोर पण संवेदनशील वडिलांची भूमिका केली. आपल्या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी त्यांनी घेतलेला संघर्ष, समाजातील रूढ विचारांशी दिलेला लढा आणि मुलींची जिद्द – हे सर्व चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आले. ‘दंगल’ने केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं नाही, तर मुलींनी खेळात पुढे यावं, यासाठी देशभरात सकारात्मक लाट निर्माण केली.

‘लाल सिंग चड्ढा’ – प्रयोगशीलतेची धाडसी झेप 

‘लाल सिंग चड्ढा’ हा 2022 साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक होता. यात आमिर खानने एका मानसिकदृष्ट्या वेगळ्या असलेल्या पण निरागस, प्रेमळ व्यक्तीची भूमिका साकारली होती. युद्ध, राजकारण, धर्म आणि मानवी नातेसंबंध अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, आमिरचा अभिनय आणि कथानक सादरीकरण यांची चर्चा सर्वत्र झाली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mardaani 3 : राणी मुखर्जी पुन्हा भिडणार! 'मर्दानी ३'ची रिलीज डेट जाहीर; बेपत्ता मुलींचा शोध आणि काळजाचा ठोका चुकवणारा थरार
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत सोमवारपासून थरारक वळण, आताच जाणून घ्या नेमके काय होणार!