10 हजार साड्या,1250 किलो चांदी , 28 किलो सोने हि अभिनेत्री होती भारतातील सर्वात श्रीमंत

अभिनेत्री ते राजकारणात प्रवेश 1997साली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत जयललिता यांचे नाव होते.त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीमुळे चाहता वर्ग मोठा होता. त्यानंतर त्या राजकारणात आल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री देखील झाल्या.

Ankita Kothare | Published : Apr 24, 2024 5:50 AM IST / Updated: Apr 24 2024, 11:23 AM IST
17

जयललिता यांच्या चेन्नईतील पोस गार्डन निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर त्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रात आरोप केले होते की, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्यांनी 188 कोटी रुपयांच्या घोषणेच्या तुलनेत त्यांच्याकडे 900 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

27

संपत्तीचा हिशेब नसतानाही, हा आकडा ऐश्वर्या रायच्या सध्याच्या 800 कोटी रुपयांच्या संपत्तीपेक्षा आणि प्रियांका चोप्राच्या 600 कोटी रुपये, दीपिका पदुकोण 560 कोटी आणि आलिया भट्ट 550 कोटी रुपये यासारख्या इतर दिग्गज भारतीय अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे.

37

1997 मध्ये जयललिता यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात त्यांच्या अफाट संपत्ती उघड झाला. अधिकाऱ्यांना 10,500 साड्या तसेच 750 जोड्यांच्या शूज सापडल्या.

47

1997 मध्ये जयललिता यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात त्यांच्या अफाट संपत्तीचा उलगडा झाला होता. अधिकाऱ्यांना 10,500 साड्या तसेच 750 शुजचे जोड्यांच्या यात समावेश होता.

57

जयललिता यांच्याकडे 91 घड्याळे, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोने होते. 2016 मध्ये त्यांच्या संपत्तीची आणखी एक चौकशी केली असता त्यांच्याकडे 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोने असल्याचे समोर आले होते. जयललिता यांच्याकडे आठ आलिशान गाड्या आणि एकूण ४२ कोटी रुपयांच्या जंगम मालमता होती.

67

जयललिता यांनी 1968 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि धर्मेंद्रसोबत 'इज्जत' या चित्रपटात भूमिका साकारली होती. 1970 च्या दशकात त्या दक्षिणेतील मुख्य अभिनेत्री म्हणून नावाजल्या होत्या.

77

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये जयललिता यांनी एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वर राव, जयशंकर आणि एमजी रामचंद्रन यांच्यासारख्या त्या काळातील सर्वात प्रमुख अभिनेत्यांसोबत सह-कलाकार म्हणून काम केले आहे .

Share this Photo Gallery
Recommended Photos