
Thane Crime News : तिहेरी हत्याकांडमुळे ठाणे शहर हादरले आहे. आरोपी अमित बागडी याने पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची निर्घृण हत्या केली आहे. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी अमितला होता. याच संशयातून त्याने स्वतःचेच संपूर्ण कुटुंब संपवलं आणि हत्यांकाड केल्यानंतर तो पसार झाला आहे.
भावना अमित बागडी (वय 24 वर्षे), खुशी बागडी आणि अंकुश बागडी अशी मृतांची नावे आहेत. लाकडी बॅटने मारा करून त्याने या तिघांचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे. रक्ताच्या थारोळ्यात हे तिघेही राहत्या घरात मृतावस्थेत पोलिसांना आढळले आणि त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅट होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामागील नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पती-पत्नी एकत्र राहत नव्हते
आरोपी अमित व त्याची पत्नी भावना गेल्या काही वर्षांपासूनच एकत्रित राहत नव्हते. अमितला दारूचे व्यसन होते आणि दारू पिऊन तो पत्नीला मारहाण करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. त्याच्या या छळाला कंटाळून भावना आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर पडली, अशी माहिती आहे.
अनैतिक संबंध असल्याचा संशय
आरोपी अमितची पत्नी गेल्या काही वर्षांपासून त्याच्याच सख्ख्या लहान भावासोबत राहत होती. आपल्या पत्नीचे भावाशीच अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. दरम्यान अमित अधेमधे पत्नी व मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात येत असे. मागील तीन दिवसांपासूनही तो ठाण्यातच होता. याचदरम्यान त्याने आपल्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या केली व घरातून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा
विकृती ! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, शरीरावर हातोड्याने केले वार
एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आईची मागणी
धक्कादायक! ट्रेनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीला तरुणाला साताऱ्यातून अटक