Maharashtra Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीसह चार जणांची हत्या, यवतमाळमधील धक्कादायक घटनेने खळबळ

Maharashtra : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासह चार जणांची हत्या केली आहे. 

Yavatmal Crime :  पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली आहे. या प्रकरणात पतीने पत्नीसह सासरे, दोन मेव्हणे यांची हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) रात्री घडल्याचे सांगण्यात आले आहे. 

यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी सांगितले की, कळंब तालुक्यातील एका व्यक्तीने आपली पत्नी, सासरे यांच्यासह चार जणांची हत्या केली. या प्रकरणातील आरोपी गोविंद पवार याला अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात हे समोर आले की, आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणास्तव आरोपीने आपल्या पत्नी, सासऱ्यांसह चार जणांची हत्या केली आहे. याशिवाय आरोपीने सासूची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण सासू यामध्ये बचावली असून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

काय आहे प्रकरण?

गोविंद पवार हा व्यक्ती कळंब येथे राहणारा आहे. प्राथमिक तपासात हे समोर आले की, गोविंदला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे गोविंद पत्नीची कोणत्याही गोष्टीवरुन अडवणूक करायचा. दोघांमध्ये याच कारणास्तव खूप भांडणं व्हायची. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडणं झाले असता गोविंदने पत्नीला खूप मारहाण केली. गोविंदच्या अशा वागण्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली.

पत्नी माहेरी गेल्याने गोविंद संतप्त होत त्याने मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) सासर गाठले. सासरी आल्यानंतरही गोविंदचे पत्नीच्या नातेवाईकांसोबत वाद झाले. यानंतर गोविंदने रागाच्या भरात तेथे असलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि पत्नीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. 

पीडित महिलेला मारहाण केली जात असल्याचे पाहून तिचे दोन भाऊ आणि वडिलही बचावासाठी आले. पण त्या तिघांचीही गोविंदने हत्या केली. याशिवाय गोविंदने सासूवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर गोविंदने घटनास्थळावरुन पळ काढला होता.

आणखी वाचा: 

Maharashtra Hit and Run Case : प्रेयसीला कारने उडवले, अश्वजीत गायकवाडला अटक

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आईची मागणी

Mumbai: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात नवऱ्याचा बायकोवर चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक

Share this article