सांगलीतील एका मुलीला गुंगीचे औषध देऊन कॅफेमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले आणि कार्यकर्त्यांनी तीन कॅफेंची तोडफोड केली आहे.
सांगली शहरातील कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरु असून ते बंद करण्यात यावेत अन्यथा रस्त्यावर उतरून गरज पडली तर सांगली बंद करू, असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिला आहे. एका कॅफे शॉपमध्ये मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला होता.
गुंगी देऊन करण्यात आला बलात्कार -
सांगली शहरातील मुलीला कॅफेमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शहरातील तीन कॅफेची तोडफोड केली होती. शहरातील कॅफेमध्ये अश्लील चाळे सूर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी कॅफेची तोडफोड केल्याची माहिती देण्यात आली आहे.
कॅफे शॉपची करण्यात आली तोडफोड -
कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याच्या आरोपावरून त्याची तोडफोड करण्यात आली आहे. यापुढील काळात कारवाई होणार नसेल तर कॅफे शॉप विरोधातील आंदोलन राज्यभर करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आला आहे. कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याच्या संशयावरून टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तोडफोड प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई -
शहरातले तीन कॅफे तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आलेले आरोप खरे आहेत का? कॅफेमध्ये खरंच असे उद्योग चालतात का? याबाबत पोलीस कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे.
आणखी वाचा -
मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची नाशिकला हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?