'मुंबईत स्पेशल 26', म्हैसूर कॅफेच्या मालकाला 25 लाखांचा लावला चुना

सार

सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली . या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

 

मुंबई: माटुंग्यातील म्हैसूर कॅफेच्या व्यावसायिकांला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोरीत आजी-माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत. सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार 'स्पेशल 26' या चित्रपटाप्रमाणेच आरोपींनी कट रचला होता. बाबासाहेब भागवत (50), दिनकर साळवे (60),वसंत नाईक (52), शाम गायकवाड (52),नीरज खंडागळे (35) आणि सागर रेडेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

'स्पेशल 26' चित्रपट पाहतच रचला कट

'स्पेशल 26' चित्रपटात दाखवलेल्या एका सीनप्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता. यातील वसंत नाईक हा मुख्य आरोपी असून वर्षभरापूर्वी त्याला म्हैसूर कॅफेतून काढले होते. मालकाच्या अंत्यत जवळचा व्यक्ती असल्याने मालकाच्या घरात दररोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती. मालकाने कामावरुन काढल्याचा राग त्याच्या मनात होता. हाच राग मनात ठेवत आरोपीने लुटीचा कट रचला होता. म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी रक्कम ठेवलेली असते हे आरोपी वसंत नाईकाला माहित होते. त्याने साथीदारांना आपल्या डोक्यात सुरू असलेली लुटीची योजना सांगितले. साथीदारांना देखील हा कट आवडला त्यांनी देखील तयारी दाखवली.

 

About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Share this article