
Crime News : राजस्थानमध्ये (Rajasthan) पुन्हा एकदा महंताची हत्या करण्यात आली आहे. यावेळी नागौर जिल्ह्यातील मेर्टा (Merta) शहरात राहणाऱ्या महंताचा जीव घेण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. जाटावास गावातील रघुराम आश्रमात राहणाऱ्या महंताची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
महंत छोटू पुरी असे त्यांचे नाव आहे. महंताचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाजवळ गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
झोपेत असतानाच महंताची हत्या
पादुकला पोलीस स्थानकातील पोलिसांनी सांगितले की, महंत छोटू पुरी आश्रमातच राहत होते. रात्री देखील छोटू पुरी आश्रमातील खोलीतच होते. आज (5 जानेवारी) सकाळी महंत खूप वेळ झोपेतून उठले नसल्याने शिष्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. महंतांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे शिष्यांना कळले. प्राथमिक तपासात असे समोर आले की, महंताची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये याआधीही करण्यात आलीय महंतांची हत्या
गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये राजस्थानमधील काही महंतांची हत्या करण्यात आली आहे. काही महंतांना ऐवढा त्रास देण्यात आलाय की, त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. महंत छोटू पुरी यांच्या हत्येमागील कारण काय आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय महंताच्या परिवाराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी वाचा :
काशी-मथुरा मंदिर प्रेमाने मिळाल्यास बाकी सर्व काही विसरुन जाऊ, गोविंद देव गिरी महाराजांचे मोठे विधान
“मला भाजपमध्ये येण्यास भाग पाडले जात आहे”- अरविंद केजरीवालांचा दावा
लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी वातावरण तापले, हजारो लोक उतरले रस्त्यावर