परळीत प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्याने वार करत निर्घृण हत्या, स्वत:लाही संपवले

Published : May 14, 2025, 12:18 PM ISTUpdated : May 14, 2025, 12:27 PM IST
Murder

सार

रायगडमधील परळी येथील एका तरुणाने प्रेयसीवर कोत्याने वार करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Raigad Crime News : रायगडमधील परळी येथील एका तरुणाने प्रेयसीवर कोत्याने वार करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना मंगळवारी (13 मे) घडल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी परळीमधील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होम येथे नर्स म्हणून काम करत होती. तिचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने तरुणीची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

नक्की काय घडले?

तरुणीने प्रेयसीची हत्या केली. यावेळी तिच्या मानेसह संपूर्ण शरीरावर कोत्याने वार केले. यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हे कृत्य केल्यानंतर तरुणाने स्वत: गळफास लावून घेत आयुष्य संपवले. या दोघांमध्ये वाद झाल्यावरुन ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे.

दरम्यान, परळीतील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय घटनेनंतर तरुणीवर ज्या ठिकाणी वार केले तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून