पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह घेऊन फिरत होता पती, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Published : May 06, 2025, 10:03 AM IST
Indore Labour Death

सार

Pune Crime : पुणे येथे एका व्यक्तीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह दुकाचीवरुन घेऊन फिरत असणाऱ्या याच व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune : पुण्यात मध्यरात्री एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बाइकवरुन फिरवत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. खरंतर, नक्की काय घडले याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश रामनायक याने पत्नी बबिता निसार हिची गळा दाबून हत्या केली. सदर घटना नांदेड पोलीस ठाण्याजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर राकेश पत्नीचा मृतदेह घेऊन दुचाकीवरुन निघाला असता वाटेत पोलिसांनी त्याला अडवले. यावेळी पोलिसांनी तो मृतदेह घेऊन फिरत असल्याचे पाहिले असता अटक केली.

या घटनेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पण अद्याप हत्येमागील कारण समोर आलेले नाही. खरंतर, राकेशने बबिताचा मृतदेह बाइकवरुन फिरवल्याच्या प्रकारामुळे नागरिक घाबरले आहेत.

PREV

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड