वडाळा येथून महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोप लावला होता.
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी मंगळवारी (5 मार्च) एका 12 वर्षीय मुलाचा मृतदेह एका महिन्यानंतर ताब्यात घेतला आहे. खरंतर एका महिन्याआधी मुलगा बेपत्ता झाला होता. संदीप यादव असे मुलाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. संदीप यादव वडाळ्याला राहणाऱ्या बिपुल सीकरी नावाच्या व्यक्तीसोबत बाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाला होता.
परिवारातील एकटा मुलगा
संदीप हा यादव परिवारातील एकुलता एक मुलगा होता. त्याचा जन्म दांपत्यांच्या लग्नाच्या 14 वर्षानंतर झाला होता. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना सोमवारी सूचना मिळाली होती वडाळा येथील खाडी परिसरात एक मृतदेह सापडला आहे. वडिलांनी मृत संदीपची ओखळ त्याचे कपडे आणि शूजवरुन पटवली. याशिवाय संदीपच्या वडिलांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोपही लावला होता. मंगळवारी (5 मार्च) तपासणीदरम्यान पोलिसांना त्या ठिकाणाहून 15-20 फूट दूरवर त्याचे डोकं सापडले. पोलिसांनी हत्येसह अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीकरी याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून वेगाने त्याचा शोध घेतला जातोय.
पॅरोलवर सुटून मुंबईत आला होता
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, सीकरी हा बंगाल येथील राहणारा आहे. सीकरी याला एका हत्येप्रकरणात याआधी अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात सीकरी पॅरोलवर सुटून मुंबईत आला होता. मिड डे च्या वृत्तानुसार, पोलीस कर्मचारी वारंग घुसे यांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. वारंग यांच्या बेजबाबदारपणामुळे आरोपीला पळ काढण्यास यश मिळाले होते.
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळ्या टीम तयार
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपीचा बंगाल, उत्तर प्रदेश आणि काश्मीरमध्ये शोध घेतला जात आहे. पण अद्याप आरोपी हाती लागलेला नाही.
आणखी वाचा :
Shocking : तरुणाचा वडील-भावासह 12 नातेवाईकांवर गोळीबार, या कारणामुळे केली सामूहिक हत्या