मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स विभागाने धाडली तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस, नक्की काय आहे प्रकरण वाचा

मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस धाडण्यात आली आहे. नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Mar 30, 2024 3:03 AM IST / Updated: Mar 30 2024, 08:36 AM IST

Crime News : मध्य प्रदेशातील ग्वालियार येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या पॅन कार्डचा (PAN Card) दुरपयोग करत कोट्यावधींचे पैशांचे ट्रांजेक्शन करण्यात आले होते आणि याबद्दल त्याला काहीच माहित नव्हते. या प्रकाराबद्दल मुलाला कळले असता त्याने पोलिसात धाव घेत तक्रारही दाखल केली होती.

महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या खात्यातून 46 कोटी रुपयांचे ट्रांजेक्शन झाल्याची तक्रार ग्वालियार जिल्हा पोलिसांकडे केली होती. प्रमोद कुमार दंडोतिया असे तक्रारकर्त्या मुलाचे नाव आहे.

विद्यार्थ्याला मिळाली इन्कम टॅक्सची नोटीस 
इन्कम टॅक्स आणि जीएसटी विभागाची नोटीस मिळाल्यानंतर खरंतर आपल्यासोबत नक्की काय घडलेय हे विद्यार्थ्याला कळले. इन्कम टॅक्स (Income Tax) आणि जीएसटी विभागाने (GST Department) विद्यार्थ्याला नोटीस धाडत पॅन कार्डच्या माध्यमातून एक कंपनी वर्ष 2021 मध्ये रजिस्टर करण्यात आली असून जी मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) सुरू करण्यात आल्याचे म्हटले होते.

पॅन कार्डचा वापर करत सुरू केली कंपनी
प्रमोदने म्हटले की, मी ग्वालियारमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. इन्कम टॅक्स आणि जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर कळले की, माझ्या पॅन कार्डचा दुरपयोग करत एका कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. खरंतर, वर्ष 2021 मध्ये कंपनी रजिस्टर करण्यात आली, जी मुंबई आणि दिल्लीत आहे.

वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी केले दुर्लक्ष
प्रमोदने म्हटले की, इन्कम टॅक्सची नोटीस मिळाल्यानंतर संबंधित विभागाशी बोलणेही झाले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करूनही कार्यवाही झाली नाही. शुक्रवारी पुन्हा पोलिसांकडे जात तक्रार केली. यावेळी पोलिसांनी म्हटले, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

आणखी वाचा : 

Crime News : मित्रचं झाला वैरी ; ब्लो ड्रायरचे नोझल गुदाशयात टाकल्याने तरुणाचा मृत्यू

Crime : जेवण व्यवस्थितीत न बनवल्याने पती-पत्नीकडून वयोवृद्ध आजीला मारहाण, कपलला पोलिसांकडून अटक

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Share this article