Crime : जेवण व्यवस्थितीत न बनवल्याने पती-पत्नीकडून वयोवृद्ध आजीला मारहाण, कपलला पोलिसांकडून अटक

Published : Mar 28, 2024, 08:11 AM ISTUpdated : Mar 28, 2024, 09:02 AM IST
arrest 2

सार

जेवण व्यवस्थितीत न बनवल्याच्या कारणास्तव एका दांपत्याने आजीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. घटना भोपाळमधील असल्याचे सांगितले जात आहे.

Crime News : भोपाळमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीकडून वयोवृद्ध आजीला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ बुधवारी (27 मार्च) व्हायरल झाला. यानंतर कपलने शहरातून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. खरंतर, आजीने व्यवस्थितीत जेवण न बनवल्याने तिला कपलकडून मारहाण केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नक्की काय घडले?
भोपाळमधील जहांगीराबाद परिसरात कपल राहतात. या प्रकरणासंदर्भात शेजाऱ्यांनी सांगितले की, 70 वर्षीय विधवा असलेल्या महिलेला मारहाण केली जायचे असे ऐकले होते. पण आता महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ गुप्तपणे शेजाऱ्यांनी काढला. यामध्ये महिलेला मारहाण केली जात असल्याचे दिसून येत होते. व्हिडीओमध्ये महिला जमिनीवर बसली असून पती-पत्नी दोघेही तिला मारहाण करत आहेत. यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला.

विधवा महिलेला सातत्याने काठीने मारहाण केली जात होती. मारहाण केल्यानंतर व्यक्ती आजीला जाऊ देत होता. त्यावेळी पुन्हा पत्नीने आजीच्या डोक्यात काठी घालत खाली पाडले.

कपलला पोलिसांकडून अटक
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जहांगीराबाद पोलिसांनी या प्रकरणात दखल घेतली. याशिवाय कपलने आजीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरातून पळ काढण्याचाही प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Crime : ठाण्यातील नागरिकावर चीनमध्ये हल्ला, बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास दिला होता नकार

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

पत्नीसोबत शेअर केला अश्लील व्हिडीओ, बंगळुरुतील कोर्टाने पतीला एका महिन्याच्या तुरुंगवासासह 45 हजार रुपयांचा ठोठावला दंड

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून