मुंबईतील एका व्यक्तीने घरातील वीज कापली जाण्याच्या भीतीपोटी तीन लाख रुपये गमावले आहेत. खरंतर हे प्रकरण जुहू येथील आहे.
Crime News : जुहू (Juhu) येथे राहणाऱ्या एका 99 वर्षीय जेष्ठ व्यक्तीची वीज बिल पेमेंटसंदर्भात (Light Bill Payment) फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने 2.79 लाख रुपये गमावले आहेत. याबद्दल पोलिसांनी माहिती देत म्हटले की, पीडित जेष्ठ व्यक्ती सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकला गेला.
पीडित जेष्ठ व्यक्तीचे नाव इए. अशोककुमार असून त्यांना मोबाइलवर 10 मार्चला एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये विजेचे बिल न भरल्याने ती कापली जाईल असे म्हटले होते. याशिवाय मेसेजमध्ये एक क्रमांक दिला होता त्यावर अशोककुमार यांनी फोन केला. यानंतर अशोककुमार यांना बँक खात्यातून चार वेळा पैसे काढल्याचे मेसेज आले. या प्रकरणात पीडित जेष्ठ व्यक्तीने शनिवारी (16 मार्च) पोलिसात धाव घेतली.
नक्की काय घडले?
अशोककुमार यांनी पोलिसांना माहिती देत म्हटले की, मेसेजमधील क्रमांकावर फोन केला असता एका व्यक्तीने मला तो टाटा इलेक्ट्रिसिटीमधील असल्याचे सांगितले. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून वीजेचे बिल न भरल्याचेही सांगितले. पण वीजेची बिल भरल्याचे फोनवरील व्यक्तीला सांगितले असता त्याने आपल्या यंत्रणेत दाखवत नसल्याचे अशोककुमार यांना सांगितले. यामुळे तुम्हाला पॅन कार्ड (PAN Card), डेबिट कार्डची (Debit Card) माहिती द्यावी लागेल. यानुसार अशोककुमार यांनी कोणताही विचार न करता फोनवरील व्यक्तीला सर्व माहिती दिली. थोड्याच वेळात एक ओटीपी (OTP) देखील शेअर करण्यात सांगितला असता तो दिला. अशातच बँक खात्यातून चार वेळा पैसे काढल्याचे मेसेज आले.
दरम्यान, गेल्या 21 महिन्यांमध्ये अडीच कोटी रुपयांची नागरिकांची वीज बिलासंदर्भात फसवणूक झाल्याची 160 प्रकरणे समोर आली आहेत. जून 2022 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान केवळ तीन प्रकरणे सोडवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी वाचा :
काळी जादू करत असल्याचा संशयामुळे 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवले, पोलिसांकडून FIR दाखल