अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अजूनही अणुयुद्धाच्या छायेत आहेत. दहशतवादी हल्ले, सीमेवरील तणाव आणि पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता यामुळे हा धोका आणखी वाढला असून, दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या मते, दहशतवादी संघटना आजही सक्रिय आहेत. त्या भारत-पाक संबंध बिघडवणारे हल्ले करण्याची योजना आखू शकतात. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, भूतकाळात झालेल्या हल्ल्यांनी हे सिद्ध केलं आहे की एक छोटी घटना संपूर्ण प्रदेशात कसा तणाव निर्माण करू शकते.
25
पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता: धोका वाढतोय का?
या रिपोर्टमधील दुसरा मोठा खुलासा पाकिस्तानच्या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दल आहे. पाकिस्तान सातत्याने नवीन आणि अधिक प्रगत मिसाइल तंत्रज्ञान विकसित करत आहे, असं यात म्हटलं आहे. हाच वेग कायम राहिल्यास, भविष्यात ते इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) सुद्धा बनवू शकतात. ही मिसाइल्स दूरच्या देशांवरही हल्ला करू शकतील.
35
ISIS-K चा धोका: दक्षिण आशियात नवा दहशतवाद?
या रिपोर्टमध्ये ISIS-K (इस्लामिक स्टेट खोरासान) या संघटनेचाही उल्लेख आहे. ही संघटना अफगाणिस्तान आणि आसपासच्या परिसरात सक्रिय आहे. तालिबान त्यांच्याविरोधात कारवाई करत असला तरी, धोका पूर्णपणे टळलेला नाही. या संघटनेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर हल्ले करण्याची क्षमता आणि इच्छा दोन्ही आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव: नवी युद्ध आघाडी उघडणार?
रिपोर्टनुसार, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधही चांगले नाहीत. सीमेवर त्यांच्यात सतत चकमकी होत आहेत. नुकतेच दोन्ही बाजूंनी झालेले हवाई हल्ले आणि प्रतिहल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. हा संघर्ष संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेवर परिणाम करू शकतो.
55
जगाला पुन्हा अणुबॉम्बचा धक्का बसणार?
तज्ज्ञांच्या मते, सध्या भारत आणि पाकिस्तान थेट युद्ध टाळू इच्छितात. पण दहशतवाद, सीमेवरील तणाव, क्षेपणास्त्रांचा विकास आणि प्रादेशिक संघर्ष यांसारख्या गोष्टी एकत्र येऊन एक धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.