PM नरेंद्र मोदींची भेट घेणार एलॉन मस्क, काय असणार अजेंडा वाचा सविस्तर...

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे. पण मस्क यांचा पंतप्रधानांच्या भेटीमागील अजेंडा काय असू शकतो याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

Chanda Mandavkar | Published : Apr 11, 2024 2:15 AM IST / Updated: Apr 11 2024, 07:49 AM IST

Elon Musk India Visit : टेस्ला (Tesla) कंपनीचे फाउंडर एलॉन मस्क एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतात येणार आहेत. मस्क यांचा भारतात येण्याचा पहिलाच दौरा असणार आहे. यादरम्यान एलॉन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. याबद्दल एलॉन मस्क यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

एलॉन मस्क यांचे ट्विट
एलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. खरंतर, मस्क यांचा भारत दौरा फार महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अशी अपेक्षा आहे मस्क भारतात टेस्लाच्या नव्या फॅक्टरीच्या स्थापनेसाठी मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा करू शकतात. दरम्यान, एलॉन मस्क भारतात 22 एप्रिल नंतर येऊ शकतात अशी चर्चा आहे. याशिवाय मस्क काही महत्त्वाच्या घोषणा देखील करू शकतात.

टेस्ला प्लांटसाठी दोन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक
याआधी अशी बातमी होती की, टेस्लाचे काही अधिकारी भारतात येऊ शकतात. भारतात टेस्लाच्या नव्या प्लांटसाठी जागा पाहण्यासाठी हे अधिकारी भारतात येणार होते. पण आता खुद्द एलॉन मस्कच भारतात येणार आहेत. भारतात टेस्लाच्या प्लांटसाठी जवळजवळ दोन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली जाईल अशी अपेक्षा आहे.

टेस्ला आणि रिलायन्समध्ये डील
टेस्ला भारतात प्लांट तयार करण्याचा विचार करत आहे. अशातच टेस्ला भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक स्थानिक भागीदाराचा शोध घेतेय. रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचे प्लांटसाठी रिलायन्ससोबत डील केली जाऊ शकते. प्लांट गुजरात आणि महाराष्ट्रात स्थापन केले जाऊ शकतात. (Elon Musk Bhartat Yenar)

गेल्या वर्षी US मध्ये पंतप्रधानांना भेटले होते मस्क
गेल्या वर्षात जून महिन्यात पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. यानंतर जुलै महिन्यात टेस्ला कंपनीने म्हटले होते की, त्यांना भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा एक कारखाना उभारायचा आहे.

एलॉन मस्क यांनी वर्ष 2019 च्या सुरूवातीलाच भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण उच्च आयात करावर आक्षेप घेतला होता. भारत सरकारने नेहमीच स्पष्ट केलेय की, टेस्लाला भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावायचे असल्यास सवलतीचा विचार केला जाईल. सरकारने टेस्लाला भारतात चीन निर्मित वाहनांच्या विक्रीसाठी मंजूरी दिलेली नाही.

आणखी वाचा : 

Peter Higgs theoretical physicist :नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

NASA कडून पूर्ण सूर्यग्रहणाचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर (Watch)

'भारताने पाकिस्तानात वर्ष 2020 नंतर 20 दहशतवाद्यांची केली हत्या', The Guardian च्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात दिलीय प्रतिक्रिया

Share this article