वर्ष 2024 मधील पूर्ण सूर्यग्रहणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
Surya Grahan 2024 : वर्ष 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला झाले. यंदा अनेक वर्षांनी पूर्ण सूर्यग्रहण झाल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. पूर्ण सूर्यग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव मॅक्सिको, कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिकेतील काही ठिकाणी पाहायला मिळाला. याशिवाय नासाकडून (NASA) सूर्यग्रहणाचे लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आले होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
लाखो नागरिकांनी पाहिले पूर्ण सूर्यग्रहण
पूर्ण सूर्यग्रहण एक महत्त्वपूर्ण आणि खगोलीय घटनांपैक एक आहे. या सूर्यग्रहणाला लाखो नागरिकांनी पाहिले. दुर्मिळ अशा पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी पूर्णपणे काळोख झाला होता. यावेळी चंद्राला पूर्णपणे सूर्याने झाकले होते. (Solar Eclipse)
नासाकडून फोटो आणि व्हिडीओ शेअर
नासाने पूर्ण सूर्यग्रहण पाहण्यासाठी लाइव्ह प्रक्षेपण केले होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओही नासाकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करण्यात आले आहेत.या घटनेसंदर्भात नासाने काही रिसर्च आणि फॅक्ट्सही प्राप्त केले आहेत. पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील पश्चिम आणि उत्तर भागात पूर्ण सूर्यग्रहणाचा नजारा पाहायला मिळाला.
पूर्ण सूर्यग्रहणाचे महत्त्व
वैज्ञानिकांनुसार, वर्षातून एकदा किंवा दोनवेळेस सूर्यग्रहण असते. खरंतर ही खगोलीय घटना आहे. पण पूर्ण सूर्यग्रहण काही वर्षांतून एकदा असते. पूर्ण सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या फार जवळ येतो. यामुळे चंद्राचा आकार मोठा दिसतो आणि सूर्य पूर्णपणे झाकला जातो. याआधी पूर्ण सूर्यग्रहण 2017 दिसले होते.
आणखी वाचा :
2024 च्या सुरुवातीलाच बाबा वेंगा यांचे हे 4 भाकीत ठरले खरे !