सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदार पूनावाला यांनी लंडनमध्ये खरेदी केले सर्वाधिक महागडे घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

Serum Institute CEO : कोरोना महामारीवर लस तयार कणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडन मध्ये आलिशान घर खरेदी केली आहे. या आलिशान घराची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

Chanda Mandavkar | Published : Dec 13, 2023 6:42 AM IST / Updated: Dec 13 2023, 01:37 PM IST

Adar Poonawala London Mansion: भारतीय व्यावसायिक आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लंडन (London) मध्ये कोट्यावधी रुपयांचे आलिशान घर खरेदी केली आहे. लंडन मधील हाइड पार्क (Hyde Park) येथील अ‍ॅबरकॉन्वे हाऊसला (Aberconway House) अदार पूनावाला यांनी जवळपास 1 लाख 440 कोटी रूपयांना खरेदी केले आहे.

पूनावाला यांनी खरेदी केलेली ही प्रॉपर्टी शंभर वर्ष जुनी असून याचे बांधकाम वर्ष 1920 मध्ये करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, ही यंदाच्या वर्षातील (2023) मधील सर्वाधिक महागडी प्रॉपर्टी खरेदी आहे. याची किंमत 138 दशलक्ष पौंड (Million Pounds) म्हणजेच जवळपास 1 लाख 440 कोटी रूपये आहे. 

सीरम लाइफ सायन्सची मालमत्ता
पूनावाला यांनी खरेदी केलेले ही प्रॉपर्टी त्यांच्या ब्रिटिश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सच्या(Serum Life Sciences Ltd) अंतर्गत असणार आहे. रिपोर्टनुसार, लंडनधील हे सर्वाधिक दुसरे महागडे घर आहे. सध्या लंडनमध्ये घरांच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे. या खरेदीनंतर लंडनमध्ये हाउसिंग मार्केट बूस्ट होण्याची शक्यता आहे.

अदार पूनावाला यांच्याशी संबंधित लोकांनी म्हटले की, सध्या कुटुंबातील मंडळींचा लंडनमध्ये येण्याचा विचार नाहीय. पण परिवातील मंडळी जेव्हा कधी लंडनमध्ये येतील त्यावेळेस ते या घरात राहू शकतात.

2011 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटचा पदभार
अदार पूनावाला यांनी वर्ष 2011 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटचा पदभार सांभाळला. त्यानंतरच सातत्याने कंपनीला यश मिळत गेले. सीरम इन्स्टिट्यूट अशावेळी लाइमलाइटमध्ये (Limelight) आली जेव्हा कोरोना महामारीदरम्यान कंपनीने लस तयार करण्याचे काम सुरू केले.

सीरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने एस्ट्राजेनेका (AstraZeneca) या फार्मास्युटिकल उद्योग कंपनीसोबत मिळून कोव्हिशिल्ड नावाची लस तयार केली. या कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) जगभरात वापर करण्यात आला. भारतातही कोव्हिशिल्डचे कोट्यावधी डोस दिले गेले. याचसोबत जगातील काही देशांमध्ये ही कोव्हिशिल्डची लस पुरवण्यात आली.

आणखी वाचा: 

सॉफ्ट ड्रिंक-दारूमुळे वर्षाला तब्बल 1 कोटी लोकांचा होतोय मृत्यू, WHOने केले मोठे विधान

North Korea : किम जोंग उन यांना अश्रू अनावर, देशातील महिलांना केली ही विनंती! पाहा VIDEO

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी

Share this article