रियाध - सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे ३६ व्या वर्षी निधन झाले आहे. २००५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या कार अपघातानंतर ते जवळजवळ २० वर्षे कोमामध्ये होते.
सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे ३६ व्या वर्षी निधन झाले. २००५ मध्ये लंडनमध्ये झालेल्या कार अपघातानंतर ते जवळजवळ २० वर्षे कोमामध्ये होते. त्यामुळे त्यांना स्लीपिंग प्रिन्स असे नाव पडले.
25
अपघातामुळे कोमात
एप्रिल १९९० मध्ये जन्मलेले प्रिन्स अल वलीद हे सौदी राजघराण्यातील सदस्य आणि कोट्यधीश प्रिन्स अल वलीद बिन तलाल यांचे पुतणे होते. १५ व्या वर्षी झालेल्या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
35
हलचालींनी दिली होती आशा
अपघातानंतर, त्यांना रियाधमधील किंग अब्दुलअझीझ मेडिकल सिटीमध्ये दाखल करण्यात आले होते. २० वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे वडील प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी आशा सोडली नव्हती.
प्रिन्स खालिद यांनी त्यांच्या मुलाच्या निधनाची पुष्टी केली. ते म्हणाले, "अल्लाहच्या इच्छेनुसार आमचा लाडका मुलगा प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल बिन अब्दुलअझीझ अल सौद यांचे निधन झाले आहे."
55
शोक व्यक्त
जागतिक इमाम परिषदेने शोक व्यक्त केला आहे. अंत्यसंस्कार रियाधमधील इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीत होतील.